Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाईकच्या मीटरमध्ये नागीण, वेगाच्या काट्यांऐवजी फन दिसते, पहा व्हिडिओ

Webdunia
गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (16:01 IST)
मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील बरहाता येथे दुचाकीच्या स्पीड मीटरमध्ये नागीण बसल्याचे पाहून दुचाकीस्वार चक्रावला. मात्र नंतर सापाला स्पीड मीटरवरून काढून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बरहाटा येथील रहिवासी असलेले नजीर हे सकाळी 6 वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून कामावर जात होते, त्यावेळी त्यांना दुचाकीवरून सापाच्या फुशारक्यासारखा आवाज आला, तेव्हा त्यांनी गाडीचे स्पीड मीटर पाहिले. तर काय त्यांना आत एक साप दिसला. नजीरने तात्काळ दुचाकी उभी करून कुटुंबीयांना माहिती दिली. स्पीड मीटरची काच थोडी हलली तेव्हा सापाची हालचाल झाली. नंतर नागिणीला कशीबशी स्पीड मीटरमधून बाहेर काढून जंगलात सोडण्यात आले.
 
नजीरने सांगितले की त्याने रात्री बाईक घराबाहेर उभी केली असताना बहुधा नागीण आत बसली असावी.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments