Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोनाली फोगाट यांचे निधन, टिकटॉक स्टार, बिग बॉसच्या स्पर्धक ते भाजप नेत्या असा होता प्रवास

Webdunia
मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (13:00 IST)
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सोनाली फोगाट यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं गोव्यात निधन झालं आहे. सोनाली फोगाट या टिकटॉक स्टार आणि बिग बॉसमधील स्पर्धक म्हणूनही प्रसिद्ध होत्या. 2019 साली हरियाणातील आदमपूरमधून भाजपनं सोनाली फोगाट यांना विधानसभेचं तिकीट दिलं होतं. आता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या कुलदीप बिश्नोई यांच्याविरोधात त्यांनी ही निवडणूक लढली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता.
 
इन्स्टाग्रामवरील शेवटची पोस्ट...
सोनाली फोगाट यांच्या निधनानंतर इन्स्टाग्रामवरील त्यांची शेवटची पोस्ट सध्या चर्चेत आलीय. सोनाली फोगाट यांनी इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक व्हीडिओ पोस्ट केला असून, या व्हीडिओला मोहम्मद रफींचं गाणं बॅकग्राऊंडला आहे.
 
रुक से जरा नकाब तो हटा दो मेरे हुजूर' हे मोहम्मद रफींचं गाणं आणि त्यावर स्वत:चा व्हीडिओ अशी पोस्ट सोनाली फोगाट यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonaliiphogat (@sonali_phogat_official)

इन्स्टाग्रामवरील शेवटची पोस्ट रात्री शेअर केलीय. म्हणजे, त्यांच्या निधनाच्या अगदी काही तासांपूर्वीची आहे.
 
तसंच, ट्विटर आणि फेसबुकवर त्यांनी आपला प्रोफाईल फोटोही काही तासांपूर्वीच बदलला होता.
 
सोनाली फोगाट यांचा अल्पपरिचय
सोनाली फोगाट यांनी 2006 मध्ये निवेदिका म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. हिसार दूरदर्शनसाठी त्या निवेदिकेचं काम करत होत्या.
 
2008 साली त्यांनी भाजपचं सदस्यत्व घेतलं आणि तेव्हापासून त्या सक्रीय राजकारण उतरल्या.
 
पंजाबी आणि हरियाणवी सिनेमांमध्ये काम, तसंच म्युझिक व्हीडिओही त्यांनी केले आहेत.
 
बिग बॉसच्या 14 व्या हंगामात सोनाली फोगाट स्पर्धक होत्या. बिग बॉसच्या घरात असताना त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटना सांगितल्या होत्या.
 
सोनाली फोगाट टिकटॉकवर प्रचंड लोकप्रिय होत्या. त्यांचे लाखोंच्या पटीत फॉलोअर्सही होते. मात्र, गलवानच्या घटनेनंतर भारत सरकारनं टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर सोनाली फोगाट यांचंही अकाऊंट बंद झालं. त्यानंतर सोनाली फोगाट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
 
आदमपूर निवडणुकीत पराभव
सोनाली फोगाट यांना भाजपनं हरियाणाच्या आदमपूर विधानसभा मतदारसंघातून 2019 साली तिकीट दिलं होतं. काँग्रेसचे उमेदवार कुलदीप बिश्नोई यांनी त्यांचा या निवडणुकीत पराभव केला होता. कुलदीप हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पुत्र होत. कुलदीप बिश्नोईंनीही आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
 
या निवडणुकीतल्या पराभवानंतर सोनाली फोगाट यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता, ज्यात त्या एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत होत्या. या व्हीडिओतली पीडित व्यक्ती हिस्सारच्या धान्य बाजारातला अधिकारी होता. सोनाली फोगाट यांनी या बाजाराशी संबंधित समस्यांवर बोलण्यासाठी तिथं गेल्या असताना हा प्रकार घडला. त्यावेळी सोनाली फोगाट यांच्यावर बरीच टीका झाली होती.
 
दिग्गजांकडून श्रद्धांजली
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सोनाली फोगाट यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.
 
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "भाजप नेत्या श्रीमती सोनाली फोगाट यांच्या आकस्मिक निधनाची अत्यंत दु:खद बातमी कळली. ईश्वरानं दिवंगत आत्म्याला आपल्या चरणी स्थान द्यावं. शोकाकूळ कुटुंबीयांना असीम दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो."
 
भाजपचे नेते कुलदीप बिश्नोई यांनीही सोनाली फोगाट यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.
 
"सोनाली फोगाट यांच्या आकस्मिक निधनाची माहिती अत्यंत दु:खद आहे. त्या अत्यंत मनमिळाऊ आणि उत्तम कलाकार होत्या. परमपिता परमात्मांनी त्यांना आपल्या चरणी स्थान द्यावं आणि कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळवो. ओम शांती"
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments