Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 18 April 2025
webdunia

Suheldev Express: सुहेलदेव एक्स्प्रेसमध्ये टीसी ला शौचालयात कोंडले

Suheldev express news
, रविवार, 13 ऑगस्ट 2023 (13:03 IST)
Suheldev Express: सुहेलदेव एक्स्प्रेसच्या दोन डब्यातील दिवे गेले. त्यामुळे प्रवासी नाराज झाले आणि त्यांनी आपला सर्व राग टीटीईवर काढला. खरं तर, ट्रेन दिल्लीच्या आनंद विहारहून यूपीच्या गाझीपूरसाठी रवाना झाली, त्यानंतर काही वेळातच ट्रेनच्या दोन कोच मधील वीज गेल्याने   संतप्त प्रवाशांनी टीसीला टॉयलेटमध्ये कोंडले. 
 
दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून उत्तर प्रदेशातील गाझीपूरला जाणाऱ्या सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनच्या दोन डब्यांमधील वीजपुरवठा अचानक गेल्याने प्रवाशांनी शुक्रवारी तिकीट कलेक्टर (टीटीई) ला टॉयलेटमध्ये लॉक केले. 
 
आनंद विहार टर्मिनलवरून ट्रेन (22420) सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस सुटल्यानंतर काही मिनिटांनी, B1 आणि B2 डब्यांमधील दिवे गेले आणि वीज बिघाड झाल्यामुळे एसीनेही काम करणे बंद केले. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी ट्रेनमधील वीज खंडित झाल्याने गोंधळ घातला आणि टीटीईला पकडून शौचालयात कोंडले. दरम्यान, रेल्वे पोलिस दलाने (आरपीएफ) अधिकाऱ्यांसह प्रवाशांना लवकरच समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
 
ट्रेन थांबवण्यात आली जिथे इंजिनिअर्सच्या टीमने पॉवर कट होण्याच्या कारणाचा तपास सुरू केला आणि B1 कोचमधील समस्या दूर केली. यानंतर बी 2 कोचमध्येही वीजपुरवठा पूर्ववत झाला आणि ट्रेन आपल्या गंतव्यस्थानाकडे रवाना झाली.
 






Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सांगोला : आज शरद पवार -देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार