पीएम केअर्स फंडमध्ये जमा झालेल्या निधीबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयानं पीएम केअर्स फंडातील रक्कम राष्ट्रीय आपत्ती मदत निधीत जमा करण्यास वा हस्तांतरित करण्यास नकार देत याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली.
पीएम केअर फंड बद्दल सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वंयसेवी संस्थेनं आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियमांचं उल्लंघन करून पीएम केअर फंड तयार करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आपत्तीच्या व्यवस्थापनासंदर्भात कोणत्याही व्यक्ती व संस्थेद्वारा करण्यात आलेली मदत एनडीआरएफकडे हस्तांतरित करायला पाहिजे,” असं सांगत संस्थेनं पीएम केअर फंडातील निधी एनडीआरएफकडे हस्तांतरित करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती.