Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पद्मावत : पूर्ण देशात रिलीज करा, प्रदर्शन न करण्याची याचीका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Webdunia
मंगळवार, 23 जानेवारी 2018 (16:02 IST)

सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा पद्मावत विरोधातील अयाचीका फेटाळली आहे. यामुळे  संजय लीला भन्साळी यांना  दिलासा  मिळाला आहे. कोर्टात पद्मावत वर  सिनेमावर बंदी आणण्यासाठी मध्य प्रदेश,राजस्थान सरकारने याचिका दाखल केली होती त्यावर नाराजी व्यक्त करत याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.सिनेमा रिलीज झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तर  मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे ती जबाबदारी पार पाडा  असं म्हणत कोर्टाने मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारची सांगत त्यांची ही  याचिका फेटाळली आहे.  कोर्टाने दोन्ही राज्यांना जोरदार खडसावले आहे, कोर्ट म्हणते की तुम्ही जर काही संघटनांच्या धमक्या आणि हिंसेचा हवाला देत असाल तर त्यावर आम्ही सुनावणी का करायची याचे कारण सांगा.  एका घटनात्मक संस्थेने सिनेमाला परवानगी दिलेली आहे, कोर्टानेही रिलीज करण्याचे आदेश दिले आहेत. तरी तुम्ही पुन्हा कोर्टाकडे येतात त्यामुळे तुमची अर्थात  कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्यांची आहेत असे सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाने निर्मात्यांना दिलासा देत हा सिनेमा सर्व राज्यांमध्ये रिलीज करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता पद्मावत रिलीज होणारच आहे. 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments