Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काबूल विमानतळावर ताबा घ्यायला तालिबान तयार

काबूल विमानतळावर ताबा घ्यायला तालिबान तयार
, रविवार, 29 ऑगस्ट 2021 (21:58 IST)
तालिबाननं त्यांच्याकडं तांत्रिक माहिती असलेले तज्ज्ञ आणि इंजिनीअर आहेत, असं म्हटलं आहे. अमेरिकेचं लष्कर काबूल विमानतळावरून बाहेर निघताच ते विमानतळावर ताबा घेतील, असंही त्यांनी सांगितलं.
 
''आम्ही अमेरिकेकडून अंतिम मंजुरीची वाट पाहत आहोत. मंजुरी मिळताच आम्ही संपूर्ण ताबा घेऊन टाकू,'' असं तालिबानच्या एका अधिकाऱ्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. ठरलेल्या वेळेमध्ये म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्य परत बोलावणार असल्याचं, अमेरिकेनं आधीच स्पष्ट केलं आहे.
 
तालिबानच्या प्रवक्त्यांच्या मते, आगामी काही दिवसांत तालिबानमध्ये नव्या सरकारची घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा त्यांना आहे. काबूलवर तालिबानचा ताबा हा अचानक झाला. त्यांना अशी अपेक्षा नव्हती असं प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहीद यांनी मान्य केलं. सरकार स्थापन करण्यात काही अडचणी आहेत, पण त्यावर चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले.
 
तालिबान काबूल विमानतळावर ताबा घेण्यास सज्ज : जबीहुल्लाह मुजाहीद
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहीद यांनी काबूल विमानतळावर ताबा घेण्यासंदर्भात अमेरिकेच्या संकेतांची वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे. विमानतळ चालवू शकतील अशा तज्ज्ञ आणि इंजिनीअर्सची टीम असल्याचं त्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
 
तालिबाननं अफगाणिस्तानच्या 34 पैकी 33 प्रांतांच्या गव्हर्नर आणि पोलिस प्रमुखांची नावं ठरवली आहेत. लवकरच देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीही काम सुरू केलं जाईल, असं जबीहुल्लाह यांनी शनिवारी म्हटलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष: काबूल विमानतळाजवळ रॉकेट हल्ला - अधिकारी