Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नरधमाचा थेट एन्काउंटर करु, हैदराबाद बलात्कार प्रकरणावर म्हणाले मंत्री महोदय

Webdunia
बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (12:44 IST)
तेलंगणातील हैदराबादमध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या केल्याच्या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्याला कठोर शासन करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत असताना तेलंगणा सरकारमधील मंत्र्यानेही नराधमाला पकडून त्याचा थेट एन्काउंटर करुन टाकू असे धक्कादायक विधान केले आहे.
 
तेलंगणा सरकारचे कामगार मंत्री मल्ला रेड्डी यांनी हैदराबाद बलात्कार प्रकरणावर संताप व्यक्त करत पीडित कुटुंबाला न्याय मिळेल असे आश्वासान दिले आहे. इतकंच नव्हे तर या प्रकरणातील नराधमाला अटक करुन त्याचा एन्काउंटर करुन टाकू असे विधानही केले आहे.
 
रेड्डी लवकरच पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहे. कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत सरकारकडून केली जाईल असं सांगतानाच आरोपीला मात्र सोडणार नाही, त्याचा एन्काउंटर करुन टाकू असं रोखठोक मत रेड्डी यांनी व्यक्त केलं आहे.
 
 
राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री सत्यवती राठोड, ज्यांनी 10 सप्टेंबर रोजी पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली. दरम्यान, हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी मंगळवारी 10 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. माहिती देणाऱ्या किंवा फरार आरोपींना अटक करण्यासाठी कोणालाही लाख. ते म्हणाले की आरोपीचे वय सुमारे 30 वर्षे आहे आणि तो मद्यपी आहे आणि फुटपाथ आणि बस स्टँडवर झोपतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

पुढील लेख
Show comments