Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाच रूपयात वरण-भात, भाजी-पोळी आणि पापड

Webdunia
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेवर आल्यापासून नवनवीन निर्णय घेण्याचा धडाका लावल्याचे दिसत आहे. आता ते राज्यातील वंचित व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांसाठी 5 रूपयांत भरपेट जेवण देण्याचा विचार करत आहेत. 
 
या 5 रूपयांच्या थाळीत भात, चपाती, डाळ, एक भाजी आणि पापड असेल. अनेकांना ऐकवेळचे जेवणही मिळत नाही, अशांसाठी हा दिलासादायक निर्णय असेल, असे मत उत्तर प्रदेशाचे दुग्धविकास व सांस्कृतिक मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी मांडले.
 
याबाबत अधिक माहिती देताना चौधरी म्हणाले, मी नुकताच छत्तीसगड येथे दौर्‍यावर गेला होता. त्यावेळी मी तेथील सरकारकडून देण्यात येत असलेल्या 5 रूपयांत मिळणार्‍या थाळीचा आस्वाद घेतला. मी तेथे असताना अनेकवेळा 5 रूपयांत जेवण केले. ते अन्न खूप स्वच्छ, चांगले आणि चवदार होते. मी तेथील स्वच्छतेवरही खूप समाधानी आहे, असे कौतुकही त्यांनी केले.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments