Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रक्ताच्या थारोळ्यात प्रदेश सचिवाचा मृतदेह आढळला

murder
, सोमवार, 11 मार्च 2024 (09:37 IST)
उत्तर प्रदेशात महिला नेत्या नंदिनी राजभर यांची दिवसाढवळ्या घरात घुसून धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली. घरातून नंदिनीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला. शेजारच्या महिलेने नंदिनीचा मृतदेह पाहिला. जमिनीच्या वादातून कारवाईची मागणी केल्याने ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या उत्साहात उत्तर प्रदेशमध्ये एका महिला नेत्याची हत्या करण्यात आली आहे. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या (सुभाषपा) महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव नंदिनी राजभर या त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या.
 
30 वर्षीय नंदिनीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. संत कबीर नगर जिल्ह्यात ही घटना घडली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. महिला नेत्याच्या हत्येमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, याला हाताळण्यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव नंदिनी राजभर गेल्या 10 दिवसांपासून जमिनीच्या वादात सक्रिय होत्या आणि पोलिस अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी करत होत्या,
 
दुपारी दोनच्या सुमारास पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन नंदिनी थेट घरी पोहोचल्या होत्या. त्यांचा  नवरा कामावर गेला होता. 7वर्षांचा एकुलता एक मुलगाही खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. सायंकाळी शेजारील एक महिला काही कामासाठी त्यांच्या घरी आली, मात्र नंदिनीचा मृतदेह पाहून तिने आरडाओरडा सुरू केला.
महिलेने गजर केला तेव्हा परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी कोतवाली पोलिसांना खुनाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस विभागाचे पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. कोतवाली पोलिस आणि फॉरेन्सिक विभागाचे पथकही पुरावे गोळा करण्यासाठी दाखल झाले.
 
मृतांच्या समर्थकांमध्ये संतापाची भावना पाहून पोलिसांनी परिसराचे छावणीत रूपांतर केले.
 
परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून डीआयजी  हेही घटनास्थळी पोहोचले आणि सुमारे तासाभराच्या अथक परिश्रमानंतर नंदिनी राजभर यांचे मारेकरी लवकरच पकडले जातील, असे आश्वासन लोकांना देण्यात आले. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभाषपा) राष्ट्रीय सचिव विनोद कुमार राजभर यांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
 
 Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रस्त्यावर थुंकाल तर होईल कारवाई