Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोफ्यावर बापाचा अन् फ्रीजमध्ये मुलाचा मृतदेह आढळला

Webdunia
शनिवार, 16 मार्च 2024 (14:21 IST)
जबलपुरातील सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन अंतर्गत मिलेनियम कॉलनीत राहणारा एक रेल्वे कर्मचारी आणि त्याच्या आठ वर्षांच्या मुलाची शेजारी राहणाऱ्या तरुणाने हत्या केली. रेफ्रिजरेटरमध्ये एका निष्पाप मुलाचा मृतदेह पोलिसांना सापडला. आरोपी तरुण त्याच्या अल्पवयीन मुलीसह फरार झाला.मध्य प्रदेशात या दुहेरी हत्येमुळे  खळबळ उडाली आहे. 
 
सदर घटना जबलपुरातील मिलेनियम कॉलोनीत राहणाऱ्या एका रेल्वे कर्मचारी आणि त्याच्या ८ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येननंतर आरोपींनी मुलाचा मृतदेह फ्रिज मध्ये ठेवला होता. या घटनेनेनंतर मयताची १४  वर्षाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. नातेवाईकांना मुलीच्या मोबाईलवरून हत्या केल्याचाही माहिती देणारा व्हॉइस मेसेज पाठविण्यात आला होता. या नंतर या घटनेचा उलघडा झाला. 
मयताचे नाव राजकुमार विश्वकर्मा असून ते रेल्वे मध्ये अधीक्षक पदावर कार्यरत होते, त्यांच्या पत्नीचं मे 2023 मध्ये आजारपणामुळे निधन झाले आहे. ते सिव्हिल लाईन्सच्या मिलेनियम कॉलोनीत आपल्या मुला आणि मुलीसह राहायचे. 
गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये मयत राजकुमार यांनी शेजारी राहणाऱ्या मुकुल सिंग याच्या विरोधात मुलीचे अपहरण केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी मुकुलला अटक केली होती. मुकुल काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. मुकुल हत्येपासून बेपत्ता असून राजकुमाराची मुलगी देखील गायब आहे. 
राजकुमारच्या मुलीने एक व्हॉइस मेसेज करून आपल्या काकाला मुकुलने तिच्या वडिलांना आणि भावाला ठार मारण्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठले आणि दरवाजा तोडून घरात गेल्यावर 
 राजकुमारचा  मृतदेह सोफ्यावर तर मुलाचा मृतदेह फ्रिज मध्ये आढळला.तर राजकुमाराची मुलगी अद्याप बेपत्ता आहे. पोलीस मुकुल आणि मुलीचा शोध घेत आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

पुढील लेख
Show comments