Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाबरी मशीद जमीन वाद खटल्याची आज सुनावणी

Webdunia
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019 (08:47 IST)
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद खटल्याची सुनावणी आज, मंगळवारी (दि.२६) सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे. याआधी पुर्नघटीत करण्यात आलेल्या पाच सदस्यीय घटनापीठामधील न्यायमूर्ती शरद बोबडे उपलब्ध नसल्याने २९ जानेवारीला होणारी सुनावणी पुढे ढकलली होती. 
 
अयोध्या प्रश्नी अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या १४ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. तसेच अयोध्येतील रामजन्मभूमीत पूजा करण्याचा मुलभूत अधिकार मिळवण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेवर तत्काळ  सुनावणी घ्यावी, अशी मागणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी करत पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर देखील आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments