Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाळेतील भांडण पोलीस ठाण्यात पोहोचले, मुलाने पेन्सिल चोरल्याची तक्रार केली

Webdunia
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (15:14 IST)
शाळा सुरु  झाली की मुलांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणांवरून भांडण होत असतात. दररोजच्या तक्रारी वर्ग शिक्षकांकडे मुलं करतातच. पण आंध्रप्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील कुडबुरु पोलीस ठाण्यात एक निरागस मुलगा वर्गात होणाऱ्या भांडणाची तक्रार घेऊन चक्क पोलीस ठाण्यात पोहोचला. कारण होते पेन्सिल चोरी गेल्याचे. 
सध्या सोशल मीडियावर पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेलेल्या या लहान मुलांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्राथमिक गटात शिकणारे हे विद्यार्थी त्यांच्या वर्गात  शिकणाऱ्या एकाच मुलाची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. या मुलाने एका  मुलावर त्याची पेन्सिल चोरी करण्याचा आरोप लावला होता. या घटनेचा व्हिडीओ आंध्रप्रदेश पोलिसांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे . या व्हिडिओमध्ये चिमुकला मुलगा आपल्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलाच्या विरोधात तक्रार करून म्हणत होता की याने माझी पेन्सिल चोरली आपण याला शिक्षा द्या.
<

Even Primary School Children trust #APPolice:
There is a paradigm shift in the attitude,behaviour&sensitivity of AP Police in way of giving confidence& reassurance to the people of #AP
AP Police stays as No1 in #SMARTPolicing in the country in @IPF_ORG Survey 2021 only testifies pic.twitter.com/Zs7CQoqqOI

— Andhra Pradesh Police (@APPOLICE100) November 25, 2021 >नंतर पोलिसांनी शांतपणे त्याची तक्रार ऐकली आणि त्याला समजावले की  तू आपली तक्रार मागे घे नाहीतर  दोषी मुलाला तुरुंगात जावे लागेल आणि त्याचे आयुष्य खराब होईल. नीट विचार कर आणि आपली तक्रार माघारी घे. नंतर मुलाने विचार करून तक्रार मागे घेतली आणि आरोप लावलेल्या मुलाशी  हात मिळवणी केली. नंतर सगळे हसत ठाण्यातून बाहेर पडले .

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments