Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलासह चालत्या ट्रेनमधून महिला कोसळली

Webdunia
सोमवार, 6 मार्च 2023 (18:39 IST)
चालत्या ट्रेन मधून चढू किंवा उतरू नये असे वारंवार सांगून देखील काही जण चालत्या ट्रेन मधून चढतात आणि उतरतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. कानपुर मध्ये  एक महिला चुकून दुसऱ्या ट्रेन मध्ये चढली आपण दुसऱ्या ट्रेन मध्ये चढलो आहोत हे समजल्यावर महिलेने चिमुकल्यासह चालत्या ट्रेन मधून उडी घेतली. ट्रेनच्या दाराच्या पायऱ्यांवरून पाय घसरून ती पडली सुदैवाने तिथे ड्युटीवर असलेले जीआरपी जवान शैलेंद्र सिंग धावत गेले आणि महिला आणि चिमुकल्याचे प्राण वाचवले. रचना श्रीवास्तव कानपूर सेंट्रल स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दोन मुलांसह ग्वाल्हेरहून उन्नावमधील तिच्या नातेवाईकाकडे जाण्यासाठी उभ्या होत्या.

ग्वाल्हेरची राहणारी रचना देवी तिच्या साडेसहा वर्षांच्या दोन मुलांसह ग्वाल्हेरहून कानपूर सेंट्रल स्टेशनवर पोहोचली. याबाबत माहिती घेतली असता गाडी एका नंबरवर येणार असल्याचे कळले. यादरम्यान ती प्लॅटफॉर्मवर रिकाम्या उभ्या असलेल्या बालमौ पॅसेंजरचा डब्यात शिरल्या. ट्रेन विरुद्ध  दिशेने जात असल्याचे तिच्या लक्षात आल्यावर तिने चालत्या ट्रेन मधून उतरण्याच्या प्रयत्न करताना प्लॅटफॉर्म वर खाली कोसळल्या त्यांना पडलेले पाहून जवळच उभे असलेले जीआरपी जवान शैलेंद्र यांनी तत्परता दाखवत महिलेला आणि  तिच्या मुलाला वाचवले. या तत्परते बद्दल जीआरपी जवान शैलेंद्र यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.      
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments