Publish Date: Sat, 19 Nov 2022 (18:54 IST)
Updated Date: Sat, 19 Nov 2022 (19:02 IST)
कुपवाडा : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या हिमस्खलनात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले. कुपवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील माछिल भागात ही घटना घडली आणि लष्कराच्या 55राष्ट्रीय रायफल्सच्या तीन जवानांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कुपवाडा पोलिसांनी सांगितले की, "दुर्भाग्यपूर्ण घटनेत, माछिल भागात हिमस्खलनाच्या तडाख्यात 56 आरआरचे 3 जवान कर्तव्यावर असताना शहीद झाले. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत."
Edited by : Smita Joshi