Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोशल मीडिया वरील व्हिडीओ आणि मीम्सला कंटाळून वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Webdunia
सोमवार, 24 जून 2024 (18:37 IST)
राजस्थानमधील जोधपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लोहावट येथे एका व्यक्तीने एका वृद्धाचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला काही तरुणांनी या वृद्धाची खिल्ली उडवत त्याचे मिम्स बनवले आणि व्हिडीओ शूट केले. या त्रासाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने सर्वांसमोर गळफास घेऊन आत्महत्या केली. 
या पूर्वी बेंगळुरू मध्ये देखील एका महिलेने ट्रोलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

या महिलेच्या हातून निसटून तिचा मुलगा बाल्कनीत पडला होता. मुलाला वाचवण्यात यश आले मात्र सोशल मीडियावर तिला ट्रॉल करण्यात आले. त्याला कंटाळून तिने आत्महत्या केली. 
 
असेच एक प्रकरण राजस्थानच्या फलोदी जिल्ह्यातील आहे. येथे सोशल मीडियावरील मीम मुले एका वृद्धाने रविवारी जोधपुरातील लोहावट मध्ये गळफास लावून आत्महत्या केली. 
झाले असे की या वृद्धाचा व्हिडीओ शूट करून काही तरुणांनी मीम बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले. रविवारी या तरुणांनी 'भंगार लेवणो है कांई' असे म्हणत वृद्धची चेष्टा करत होते. या दरम्यान या वृद्ध व्यक्तीने अनेक वेळा छेडछाड करत असलेल्या तरुणाचा पळ काढून पाठलाग केला वारंवार त्याची या तरुणाने चेष्टा केल्याने तो दुखावला आणि त्याने लोकांसमोरच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

तरुण चेष्टा करत असताना हा वृद्ध व्यक्ती झाडावर चढला. तरुण त्याचा व्हिडीओ बनवत होते. आजूबाजूला उभे असणारे लोक हे बघत होते. आणि पाहता-पाहता या वृद्धाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. तरुण या व्यक्तीला वाचवण्याऐवजी तिथून पळून गेले. 
 
तुम्ही मला खूप त्रास दिला आता मजा घ्या आणि असं म्हणत ते झाडाला लटकले. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  
घटने नंतर लोहावट पोलीस घटनास्थळी पोहोचले तो पर्यंत वृद्धाचा मृत्यू झाला होता. 
मिळालेल्या माहितीनुसार, दोन- तीन महिन्यांपूर्वी एक जपानी महिला मेगुनी मारवाडला भेट देण्यासाठी आली होती. एके दिवशी ती तिच्या मैत्रिणींसोबत जात असताना तिला एक म्हातारा गाडी ओढताना दिसला.

महिलेने मदत साठी विचारले असताना म्हातारा म्हणाला आपल्याला काय करायचे आहे, भंगार घ्यायचे आहे का ? काही तरुणांनी याचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडीओवरून या वृद्ध व्यक्तीची चेष्टा केली जात होती. या मुळे त्याने टोकाचे पाऊले घेत आपले आयुष्य संपविले. 

लोहावट पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक शैतानराम पवार यांनी सांगितले की घटनेची माहिती मिळाल्यावर लोहावट पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. घटनास्थळावरून एक ठेला गाडी मिळाली आहे त्यात काही जुने सामान सापडले आहे. मयताच्या जवळून प्रतापराम केसरराम प्रजापती राहणारे चौहटन बाड़मेरअशी कागदपत्रे सापडली आहे. 

Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments