Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेत्रीची ट्रॅफिक होमगार्डला मारहाण, पोलिसांनी गुन्हा दाखल केला

Webdunia
बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (12:32 IST)
तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सौम्या जानू हिने ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक होमगार्डला मारहाण करण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ट्रॅफिक होमगार्ड ला मारहाण करून त्याचे कपडे फाडून त्याचा मोबाईल हिसकवून घेतल्याचा आरोप या अभिनेत्रीवर आहे. 

माहितीनुसार, बंजारा हिल्स मध्ये अभिनेत्रीला कार चालवताना ट्रॅफिक होमगार्डने अडवले सदर घटना 25 फेब्रुवारीची आहे. अभिनेत्रीला ट्रॅफिक होमगार्डने अडवल्यावर अभिनेत्रीने भर रस्त्यात आरडाओरड केली आणि ट्रॅफिक होमगार्डचे कपडे फाडून त्याचा फोन हिसकावला. ही संपूर्ण घटना केमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडीओ मध्ये अभिनेत्री कार मधून उतरली आणि आरडाओरड करू लागली. तिच्या आजूबाजूला लोक जमा झाले. तिथे असलेल्या लोकांनी सांगितलं की अभिनेत्री ने होमगार्डवर हल्ला केला आणि त्याचे कपडे फाडून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला.  

घटनेनन्तर होमगार्डने बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुरावा म्हणून त्याने रेकॉर्ड केलेला व्हिडीओ दिला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास लावत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments