Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनोखा मुख्यमंत्री, संपत्ती केवळ ३९३० रुपये

अनोखा मुख्यमंत्री, संपत्ती केवळ ३९३० रुपये
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांची संपत्ती केवळ ३९३० रुपये आहेत. विशेष म्हणजे आतापर्यत कधीही इन्कम टॅक्स रिटर्न (आयकर परतावा) दाखल करण्याची आवश्यकता भासलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीआधी दाखल केलेल्या नामांकन पत्रात जाहीर केलल्या उत्पन्नाच्या माहितीतून ही माहिती दिली आहे. धानपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढणाऱ्या सरकार यांनी  नामांकन पत्र दाखल केलं. 
 
माणिक सरकार आपलं संपूर्ण वेतन 'माकपा'ला दान देतात. तर त्यांना  उपजीविका भत्ता म्हणून महिन्याला पाच हजार रुपये मिळतात. घोषणापत्रानुसार, ६९ वर्षीय माणिक सरकार यांच्याकडे केवळ १५२० रुपये रोख रक्कम आहेत तर २४१० रुपये त्यांच्या खात्यामध्ये आहेत. त्यांच्याकडे आणखी कोणताही उत्पन्नाचा स्रोत नाही. इतकंच नाही तर त्यांच्या नावावर कृषीयोग्य किंवा घर बनवण्यासाठी कोणतीही जमीन नाही. ते मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवास्थानी राहतात.
 
मुख्यमंत्र्यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य सेवानिवृत्त केंद्र सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे २०,१४० रुपये रोख रक्कम तर दोन बँक खात्यांत १,२४,१०१ आणि ८६,४७३ रुपये जमा आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बजेटमध्ये करमुक्त इन्कमची सीमा तीन लाखापर्यत शक्य