Chennai News : चेन्नईमध्ये दूषित पिण्याच्या पाण्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून 19 जणांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोस्टमोर्टमचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे आरोग्यमंत्र्यांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये दूषित पाणी प्यायल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर 19 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील पल्लवरम परिसरात नुकत्याच झालेल्या पावसामुळे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात गेल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तामिळनाडूचे आरोग्य मंत्री मा सुब्रमण्यम यांनी रूग्णालयाला भेट देऊन रूग्णांची विचारपूस केली. ते म्हणाले की, पाण्याचे नमुने सविस्तर तपासणीसाठी गिंडी येथील किंग इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन अँड रिसर्च येथे पाठविण्यात आले आहे. सुब्रमण्यम म्हणाले की, पोस्टमोर्टमचा अहवाल आल्यानंतर मृताच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.