rashifal-2026

पाकच्या आयएसआयचे दोन संशयित अटकेत

Webdunia
बिलासपूर- छत्तीसगढ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर त्यांनी पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी काम करणार्‍या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
 
छत्तीसगढमधील जंजिरा-चंपा येथी मनविंदर यादव आणि संजय देवांगण यांना ताब्यात घेतले आहे. देशविरोधी कारवायांच्या आरोपाखाली दहशतवादविरोधी पथकाने अलीकडेच जम्मू आणि मध्यप्रदेश येथून सतविंदर सिंग, रिझवान तिवारी आणि बलराम यांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेले दोन सं‍शयित या तिघांसाठी काम करत होते. त्यांच्याविरूद्ध देशद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनविंदर यादव आणि संजय देवांगण वेगवेगळ्या बँकेत खाते आहे.
 
या खात्यांवरून ते एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी पैसे पाठवत होते. आम्हाला माहिती मिळाल्यानंतर तातडीने कारवाई पोलिस अधीक्षक मयांक श्रीवास्तव यांनी दिली. या दोघांच्या दूरध्वनीवरील संभाषणावर लक्ष ठेवून ते टॅप करून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीनंतर मनविंदरने रिझवान तिवारीसाठी काम करत असल्याचे कबूल केले. तिवारीच्या सूचनेवरूनच पैसे पा‍ठविल्याचेही त्याने सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

पुढील लेख
Show comments