गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' जवळ बांधकाम सुरू असलेल्या 'आदिवासी संग्रहालय' जागेवर चोरी केल्याच्या संशयावरून सहा कामगारांच्या गटाने दोन आदिवासींना मारहाण केली आहे.नर्मदा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रशांत सुंबे यांनी सांगितले की, हे प्रकरण 6 ऑगस्टच्या रात्री घडले आहे.
"सहा बांधकाम कामगारांच्या गटाने केवडिया राहणारे जयेश आणि जवळच्या गभन गावातील रहिवासी संजय यांना बांधले आणि नंतर त्यांना मारहाण केली, यामध्ये जयेशचा जागीच मृत्यू झाला, तर संजयचा आज सकाळी राजपिपला येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
या प्रकरणात सहभागी असलेल्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर हत्येचा आरोप आहे. तसेच ''भरुचचे भाजप खासदार मनसुख वसावा म्हणाले की, कंपनीने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 20 लाख रुपये मदत आधीच दिली आहे.