लग्न करून नव्या नवरीला घरी गाजत-वाजत आणतात.लग्नानंतर जोडपे नवीन स्वप्न बघतात. असेच काही नवीन स्वप्न घेऊन एका तरुणाने उत्तरप्रदेशातील मथुरेतील सौंख येथे मंदिरात लग्न करून सासरी आणले.लग्नाच्या पहिल्या रात्रीच नववधू बेपत्ता झाली. नववधू ने जेवणात गुंगीचे औषध घालून पसार झाल्याची माहिती मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.
मथुरेतील कसबा सौंख येथे राहणाऱ्या एका तरुणाचे लग्न एका नातेवाईकांनी सोनभद्रच्या तरुणीशी जुळवून दिले. शनिवारी 2 डिसेंबर रोजी मुलीच्या घरचे मुलीसह मुलाकडे आले. सर्व ठरले आणि त्यांचे दोघांचे लग्न एका मंदिरात लावून दिले. ज्याने हे लग्न जुळवले होते त्याला काही पैसे दिले गेले.
शनिवारी 2 डिसेंबरच्या रात्री मुलीला घेऊन नवरदेव कडील मंडळी घरी आले. रात्री सर्व झोपले. सकाळी उठून बघतात तर नवरी घरातून बेपत्ता झाली होती. सगळीकडे शोधून देखील तिचा काहीच पत्ता लागला नाही. तेव्हा मुलाकडील मंडळींनी स्थानिक पोलीस ठाण्यात मुलीने फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्यांना बोलावले आहे. अद्याप मुलीचा तपास लागला नाही. पोलीस प्रकरणाचा शोध लावत आहे.