Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pune : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून स्कूल बस झाडावर आदळून अपघातात विद्यार्थी जखमी

accident
, मंगळवार, 5 डिसेंबर 2023 (18:37 IST)
Pune Accident : पुण्याच्या वाघोलीत एका शाळेची बस झाडावरून आदळून भीषण अपघात झाला या अपघातात शाळेचे काही विद्यार्थी जखमी झाले आहे. बस चालकाचा बसवरील नियंत्रण सुटून बस झाडावर आदळून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमी विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
 
या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवत आहे. पुण्यातील रायझिंग स्टार शाळेची ही बस होती. या बसमध्ये विद्यार्थी होते. अपघातामुळे काही विद्यार्थी जखमी झाले आहे. जखमी विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. बसवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात  झाला असून बसच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

या मध्ये बस रास्ता सोडून थेट बाजूला असलेल्या झाडावर आदळली.असे दिसून येत आहे.  
बसवर आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालकवर्ग करत आहे. या अपघाताबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pune : ऐतिहासिक भिडे वाडा महानगरपालिकेने जमीनदोस्त केला