पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची गोळी झाडून भर दिवसा हत्या करण्यात आली. या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध दिल्ली, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र आणि राजस्थानचे पोलीस घेत होते. हत्याकांडाचे आरोपी अंकित, सचिन, प्रियव्रत, कपिल आणि दीपक मुंडी हे मोकाट फिरत होते. त्यापैकी आता काही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिद्धू मुसेवालाची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांचा व्हिडीओ समोर आला असून हे मारेकरी हत्या करून कारमध्ये फरार होतानाचा हा व्हिडीओ आहे.
या मध्ये मारेकऱ्यांनी हातात बंदूक घेतली असून कारमध्ये गाणी वाजवत असून हसत आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल ने आरोपींपैकी सचिन, प्रियव्रत, अंकित आणि कपिल ला अटक केली असून दीपक अद्याप फरार आहे.