मणिपूर मध्ये पुन्हा हिंसाचार उसळला आहे. कुकी-जो समाजासाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरे बिरेन सिंग यांनी फेटाळून लावल्यांनंतर इंफाल पश्चिम जिल्ह्यात पुन्हा हिंसाचार उसळला आहे. रविवारी संशयित अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक महिलेसह दोन जण ठार झाले तर 9 जण जखमी झाले. या हल्ल्यांनंतर सुरक्षा दल अलर्टमोड वर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरेक्यांनी टेकडीच्या वरच्या भागातून कौत्रुक आणि कडांगबंद मधील खोट्याच्या खालील भागात अंदाधुंद गोळीबार केला. या परिसरात ड्रोनद्वारे बॉम्बहल्ला करण्यात आला या मध्ये एका महिलेसह दोघे मरण पावले तर 9 जण जखमी झाले. या गोळीबारात अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
गावात अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली. महिला, मुले आणि वृद्ध लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. परिस्थिती स्थिर करण्यासाठी राज्य आणि केंद्रीय तुकड्यांसह सुरक्षा दल तैनात केले आहे. "राज्य सरकारने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तत्काळ कारवाई सुरू केली आहे आणि इंफाळ पश्चिमेतील कौत्रुक गावावरील हल्ल्यात सहभागी असलेल्यांना शिक्षा दिली आहे," असे गृह विभागाने सांगितले.