Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रदूषण मुक्ती साठी जाळणार तब्बल ५० हजार किलो लाकडे

प्रदूषण मुक्ती साठी जाळणार तब्बल ५० हजार किलो लाकडे
, बुधवार, 21 मार्च 2018 (11:01 IST)
चांगले करतांना लोक कसे वेड्या सारखे वागतात याचा पुन्हा प्रत्येय येतो आहे. असाच काहीसा प्रकार समोर येतोय. मेरठमध्ये असाच सामाजिक संदेश देतांना मुख्य उद्देश काय आणि करतोय काय याचा ताळमेळ अजिबात लागतांना दिसत नाहीये. मेरठ येथे मोठ्या भव्य उत्र्सवात साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्रीच्या यंदा प्रदूषण मुक्तीसाठी विशेष यज्ञ करण्यात येणार आहे. यामधील मोठी हास्यास्पद कृती अशी की आयोजकांकडून या यज्ञासाठी  तब्बल 50 हजार किलो लाकूड समिधा म्हणून वापरण्यात येणार आहे. मेरठच्या श्री अयुतचंडी महायज्ञ समितीकडून प्रदूषण मुक्तीच्या उद्देशाने महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. वाराणसीतील 350 ब्राह्मण या यज्ञात सहभागी होणार असून नऊ दिवस हा यज्ञ चालणार आहे. यासाठी एका मोठ्या मंडपात अनेक यज्ञकुंडे तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे हा यज्ञ प्रदूषण मुक्तीसाठी आहे की अधिक प्रदूषण करण्यासाठी आहे, असा प्रश्न काहीजणांकडून विचारण्यात येत आहे. त्यामुळे भव्य करतांना काही चूक तर होत नाही ना हे तपासून पाहिले पाहिजे आणि इतके लाकूड जळाले तर किती नुकसान आणि प्रदूषण होईल याचा अंदाज येतोय त्यामुळे खरच हा उद्देश आहे की प्रसिद्धी साठी कहीही करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची असा प्रकार तर नाही ना ?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोबाइल चार्जिंगला लावताच स्फोट, तरूणीचा मृत्यू