नव्या संसद भवनात ठेवणार पारंपरिक राजदंडसेंगोल , राजदंडसेंगोल म्हणजे काय त्याचा इतिहास काय आहे. ?
28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संसद भवनात सेंगोल ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबरसंसद भवनाच्या निर्मितीसाठी ज्या 60 हजार कामगारांनी योगदान दिलं आहे,त्यांचाही यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी सन्मान करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.आज ते दिल्लीहून बोलत होते.
ज्या दिवशी संसद राष्ट्राला समर्पित केले जाईल, त्याच दिवशी तामिळनाडूहून आलेल्या विद्वानांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना हे सेंगोल देण्यात येणार आहे.त्यानंतर हे सेंगोल संसदेत कायमस्वरुपी लावण्यात येणार आहे”, असेही अमित शाह म्हणाले.
सेंगोलविषयी सांगताना अमित शाह म्हणाले की, 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री पंडित जवाहरलाल यांनी तमिळनाडू येथून आलेल्या सेंगोलचा स्विकार केला. यासाठी संपूर्ण विधी करून त्याचा स्विकार केला होता. त्यांच्या निवासस्थानी अनेक नेत्यांच्या उपस्थितीत सत्ता हस्तांतराच्या प्रक्रियेला पूर्ण केलं होते.यावेळी डॉ. राजेंद्र प्रसाद होते. भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय देण्यात आला त्यावेळी लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंडित जवाहरलाल यांना विचारलं की, सत्ता हस्तांतरणाबाबत काय कार्यक्रम आहे? त्यावेळी सहकाऱ्यांशी चर्चा करून सांगतो असे ते म्हणाले.
सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सी. गोपालाचीर यांनाही विचारले. यावेळी अभ्यासाअंती सेंगोलच्या प्रक्रियेला चिन्हित केलं गेलं. पंडित नेहरू यांनी पवित्र सेंगोलला तमिळनाडूहून मागवंल होतं. त्यानंतर इंग्रजांकडून सेंगोल राजदंड स्वीकारून सत्ता स्थापन केली होती.सेंगोल ज्यांना मिळतो त्यांना निष्पक्ष आणि न्यायपूर्ण शासन करणे अभिप्रेत असतं. हा राजदंड चोला साम्राज्याशी निगडीत आहे. तामिळनाडूच्या पुजाऱ्यांकडून यावर धार्मिक क्रिया करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य काळात हा राजदंड नेहरूंकडे सोपवण्यात आला होता. 1947 नंतर या राजदंडाचा विसर पडला होता. 1971 मध्ये तामिळनाडूच्या विद्वांनांनी हा राजदंड पुन्हा चर्चेत आणला होता. तर, 2021-22 मध्ये भारत सरकारने याविषयी माहिती केली होती. महत्त्वाचं म्हणजे १९४७ साली तमिळचे जे विद्वान उपस्थित होते ते 28 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमातही उपस्थित राहणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती अमित शाहांनी दिली.
चोल साम्राज्याच्या इतिहासातून कोडं सुटलं
हे कोडं सोडवण्यासाठी नेहरुंनी तेव्हाचे ज्येष्ठ नेते सी राजगोपालचारी यांची भेट घेतली. त्यांना आपल्यासमोरचं कोडं सांगितलं. राजगोपालचारींचा भारतीय इतिहास, संस्कृतीवर प्रंचड अभ्यास होता. मूळच्या तामिळनाडूच्या असलेल्या राजगोपालचारींनी नेहरुंच्या कोड्यांचं उत्तर शोधलं ते चोल साम्राज्याच्या इतिहासातून.
R S
चोल साम्राज्य हे भारताच्या इतिहासातील एक महत्वाचं साम्राज्य होतं. नवव्या शतकात चोल साम्राज्याचा उदय झाला. पुढे तेराव्या शतकापर्यंत हे साम्राज्य आता अस्तित्वात असलेल्या 11 देशांमध्ये पोहोचलं होतं. दक्षिण भारत, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलँड, मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हीएतनाम, सिंगापूर आणि मालदीव इतक्या सगळ्या देशांमध्ये चोल साम्राज्याची पताका फडकत होती. अर्थात तेव्हा यातल्या अनेक देशांची नाव वेगळी होती. इथं चार शतकांपेक्षा जास्त काळ चोल साम्राज्याचीच सत्ता होती आणि याच चोल साम्राज्याच्या इतिहासातून राजगोपालचारींनी नेहरुंच्या प्रश्नाचं उत्तर शोधलं.
दक्षिणेतल्या ऐतिहासिक चोल साम्राज्यात नव्या राजाची निवड होत असताना, पदावरुन दूर जाणारा राजा आपल्या हाताने सेंगोल म्हणजेच राजदंड पुढच्या राजाच्या हातात देतो आणि अशाच पद्धतीनं चोल साम्राज्यात शतकानुशतकं सत्तेचं हस्तांतर होत होतं.
What is Sengol : सेंगोल म्हणजे नेमकं काय?
'सेंगोल' हा शब्द तामिळ शब्द 'सेम्माई' वरून घेण्यात आला आहे. त्याचा अर्थ नीतिपरायणता असा आहे. तामिळनाडूतील एका प्रमुख धार्मिक मठातील मुख्य मठाधीपती यांचा आशीर्वाद असल्याचं सांगितलं जातं. न्यायाचा रक्षक म्हणून त्यावर हाताने कोरलेला नंदी बसवण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सेंगोल धारण करणार्या व्यक्तीला न्याय्य आणि निष्पक्षपणे राज्य करण्याचा आदेश देण्यात आला आहे. लोकांच्या सेवेसाठी आपल्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे हे त्याने विसरू नये असे निर्देश असतात.
R S
सेंगोल म्हणजे महादेवाचा आशीर्वाद अशी धारणा होती आणि त्याचं सेंगोलच्या हस्तांतरानं चोल साम्राज्यात सत्तेचं हस्तांतर व्हायचंय. हीच संकल्पना सी राजगोपालचारींनी पंडित नेहरुंना सांगितली. इतकंच नाही तर सत्तेचं हस्तांतर होत असताना यापेक्षा चांगलं प्रतिक मिळणार नाही असंही पटवून दिलं.
सी राजगोपाल यांनी सांगितलेली संकल्पना पंडित नेहरुंनाही आवडली आणि त्यांनी होकार दिला. त्यावेळी राजगोपालचारींनी एक समिती स्थापन केली. त्यामध्ये दक्षिणेतील काही महंताचा समावेश केला. राजगोपालचारींनी तामिळनाडूंच्या महंतांना आपला हेतू सांगितला. तेव्हाच्या मठाधीशांनीही राजगोपालचारींच्या विनंती होकार केला आणि 1947 साली वुम्मिदी बंगारु ज्वैलर्सकडून नव्या राजदंडाची निर्मिती केली. या राजदंडावर नंदीची मूर्तीही स्थापित केली.
हाच राजदंड पुढे दिल्लीत पोहोचला आणि त्याची विधिवत पूजा करण्यात आली. 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी हाच राजदंड लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंच्या हातात दिला. अशा प्रकारे देशातल्या ब्रिटिश सत्तेचे हस्तांतर भारतीयांकडे झालं
हाच राजदंड स्वीकारल्यानंतर पंडित नेहरुंनी रात्री 12 वाजता ऐतिहासिक भाषण केलं. आता हाच राजदंड पुन्हा एकदा 75 वर्षांनी एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor