नवी दिल्ली- भारतीय सैन्याने पहिल्यांदा हिममानव यती अस्तित्वात असल्याची शक्यता वर्तवली आहे. या संबंधात आर्मीने ट्विटवर काही फोटो देखील जारी केले आहेत, यात बर्फावर हिममानवाच्या पायांचे ठसे दिसत असल्याची चर्चा आहे.
आर्मी ने ट्विट केले की पहिल्यांदा भारतीय सेना माउटाइरिंग एक्सपेडिशन टीमने 9 एप्रिल, 2019 रोज मकालू बेस कँपजवळ 32x15 इंची हिममानवाचे पावलांचे ठसे बघितले आहे. हा हिममानव याआधी केवळ मकालू-बरुन नॅशनल पार्कमध्ये दिसला होता, असे लष्कराने ट्विटमध्ये म्हटले आहे.
जाणून घ्या यती संबंधी खास 5 गोष्टी-
- यती बद्दल सांगण्यात येते की हे जगातील सर्वात रहस्यमयी प्राण्यांमधून एक आहे. काही शोधकर्त्यांप्रमाणे ही पोलर बियर प्रजाती आहे जी 40 हजार वर्ष जुनी आहे. काही शोधकर्त्यांनुसार ही हिमालयात राहणारी भालूची एक प्रजाती आहे.
- काही वैज्ञानिकांप्रमाणे यती एक विशालकाय जीव आहे. माकडासारखा दिसणारा हा जीव मनुष्याप्रमाणेच दोन पायांवर चालतो.
- यती एक पौराणिक प्राणी आहे. नेपाळ, लडाख आणि तिबेटच्या हिमालय क्षेत्रात निवास करतो असे म्हणतात. यतीचा उल्लेख पुराणांमध्ये देखील मिळतो.
- यती दिसण्यात एक सामान्य मनुष्यापेक्षा उंच, भालू सारखा आणि केसांनी पूर्ण शरीर झाकलेला असा दिसतो. यतीमधून एक विचित्र प्रकाराची गंध असल्याचे देखील म्हटले गेले आहे. यती ओरडतो आणि खूप बलवान असतो.
- हा मायावी स्नोमॅन यापूर्वी केवळ मकालू-बरुन नॅशनल पार्क मध्ये दिसला होता.