Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी काय करू शकते याची तुम्ही कल्पना करू शकत नाही', अंजूची पती अरविंदला धमकी

Webdunia
रविवार, 30 जुलै 2023 (15:22 IST)
फेसबुक फ्रेंड नसरुल्लाह साठी पाकिस्तानात पोहोचलेल्या अंजूचे पहिले पती अरविंदसोबत संभाषण झाले आहे. त्याने अरविंदला धमकी दिली आहे. तसेच मी मुलांना भेटायला येणार असल्याचे सांगितले. अंजूने पाकिस्तानच्या नसरुल्लाशी लग्न केले आहे आणि आता ती फातिमा झाली आहे. अंजूचा पती अरविंद पाकिस्तानात पोहोचला आणि फोनवर बोलला. यादरम्यान ती अरविंदला धमकावताना दिसली.त्याचवेळी ती खूप वाईट बोलतांना दिसली.

अंजुने पती अरविंदला शिवीगाळ केली आहे. तसेच दोन्ही मुलांना घेऊन जाण्याची धमकी दिली आहे. अंजु म्हणाली मी कोणत्याही थराला जाऊ शकते. मी काय करेन ह्याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल. मीडिया तुम्हाला नाचवत आहे आणि तुम्ही नाचत आहात. तू सर्वांना सत्य का सांगत नाही. मला जिथे वाटेल तिथे मी राहणार, तू मला जाब विचारणारा कोण आहे.माझे दुर्देव की, मी अशा माणसांसोबत आणि अशा परिवारासोबत राहते. मी भारतात आले की माझ्या मुलांना देखील सोबत आणेन.  
 
पाक मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्लाम स्वीकारल्यानंतर अंजूला फातिमा हे इस्लामिक नाव देण्यात आले. जिल्हा न्यायालयात हा विवाह झाला आणि अंजूने इस्लाम धर्म कारला. मलाकुंड विभागाचे डीआयजी नासिर मेहमूद दस्ती यांनी अंजू आणि नसरुल्ला यांच्या लग्नाला दुजोरा दिला जिल्हा व सत्र न्यायाधीश डीआयजी मलकुंड यांच्या न्यायालयात दोघांचा विवाह झाला, त्यानंतर अंजूला पोलिस संरक्षणात घरी नेण्यात आले. 
 
अंजूपासून फातिमा बनलेल्या भारतीय महिलेला एका पाकिस्तानी व्यावसायिकाने एक भूखंड (प्लॉट) भेट दिला आहे. यासोबतच मदतीचा धनादेशही सुपूर्द करण्यात आला आहे.मात्र, चेकमध्ये किती पाकिस्तानी रूपयांचा उल्लेख आहे, याचा उल्लेख नाही. राजधानी इस्लामाबादहून खैबर पख्तुनख्वा प्रांतातील नसरुल्लाहच्या घरी भेटवस्तू घेऊन आलेल्या या व्यावसायिकाने अंजू उर्फ ​​फातिमाला त्याच्या कंपनीत नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वरळी हिट अँड रन प्रकरणात कोणत्याही राजकीय दबावात न येण्याचे फडणवीसांचे मुंबई पोलिसांना आदेश

पत्नीची हत्या करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड येथे ऑटो रिक्षा आणि ट्रकची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

महिला पोलीस भरतीसाठी चिमुकल्याला घेऊन आलेल्या महिला उमेदवाराचे बाळ पोलिसांनी सांभाळले

मुंबईच्या रुग्णालयात रुग्णांच्या रिपोर्ट्सच्या पेपर प्लेट बनवण्याचा धक्कादायक प्रकार

पुढील लेख
Show comments