नाशिक येथील शहरातील नांदूरनाका परिसरात ५ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये पिडीत मुलीवर शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीसानी सचिन हिरामण पाटील (३४ वर्ष) या संशयित आरोपीस अटक केली आहे. सचिन पाटील हा पिडीत मुलीच्या परिसरातीलच रहिवासी आहे. सचिन
पाटील यास १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली आहे.