Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खडसेविषयी मुख्यमंत्री निर्णय घेतील : अमित शाह

Webdunia
शनिवार, 28 मे 2016 (15:22 IST)
एकनाथ खडसे यांच्याविषयी प्रश्न राज्य सरकारचा आहे आणि मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील, असे सांगत  भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.

केंद्रीय नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असल्याचे शाह म्हणाले, खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी गृह मंत्रालयातर्फे करणार का, याबाबत बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

दरम्यान, खडसे आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यातील कथित संभाषण सीबीआयच्या रडारवर आले आहे. शुक्रवारी सीबीआयने मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाला त्याबाबत माहिती मागितल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

खडसेंचे दाऊदसंबंधी संभाषण असो की त्यांच्या निकटस्थांचे लाचप्रकरण असो, तपास सीबीआयकडे सोपविणे राज्य सरकारवर अवलंबून असेल. अद्यापपर्यंत सीबीआयला तशी शिफारस करण्यात आलेली नाही. खडसेंनी याबाबत गृहमंत्रालय आणि अन्य विभागाला पाठविलेली पत्रे सीबीआयच्या सुपुर्द करण्यात आल्यास प्राथमिक चौकशी नोंदविली जाऊ शकते.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments