Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिहारात नक्षली हल्ल्यात 10 जवान शहीद

Webdunia
औरंगाबाद- बिहारमध्ये सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांविरोधात हाती घेतलेल्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. येथील गया व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्लत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दहा जवान शहीद झाले आहेत. तर, चार जखमी झाले आहेत. हे सर्व जवान सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनचे होते. सीआरपीएफच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन नक्षलवादीही मारले गेल्याचे वृत्त आहे.
 
सीआरपीएफच्या जवानांनी 16 जुलैपासून गया व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमाभागात शोधमोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरू असतानाच काल रात्री अकराच्या सुमारास नक्षलवादी व जवान समोरासमोर आले. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला करण्याची तयारी आधीच केली होती. सुरक्षा दलाचे जवान डुमरी नाला इथे पोहोचताच दबा धरून बसलेल्या जवानांवर गोळीबार केला, नंतर तब्बल 30 भू-सुरुंग स्फोट घडवून आणले.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments