Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री सिध्दरामयंचे महिलेने घेतले चुंबन

Webdunia
बंगळुरु- विविध कारणांमुळे चर्चेत राहाणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या पुन्हा एकदा विचित्र कारणासाठी चर्चेत आले आहेत. रविवारी बंगळुरुमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान एका महिलेने सिद्धरामय्या यांच्या गालाचे चुंबन घेतले. गिरिजा श्रीनिवास असे या महिलेचे नाव आहे. 
 
चुंबन घेणारी सदर महिला चिकमंगळुरु जिल्ह्यातील तरीकेरे येथील तालुका पंचायत सदस्य आहे. रविवारी एका जाहीर कार्यक्रमात तिला सन्मानित केल्यानंतर तिने सर्वासमक्ष मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गालाचे चुंबन घेतले. सिद्धरमय्या ज्या कुरुबा समाजातून येतात त्या समाजाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
 
या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना गिरीजा म्हणाली की, सिद्धरमय्या मला वडिलांसारखे आहेत. मी त्यांना अप्पाजी म्हणून बोलावते. माझ्या शालेय जीवनापासून मी त्यांची खूप मोठी चाहती आहे. 
 
मला त्यांना पहिल्यांदा भेटण्याची संधी मिळाली त्यामुळे मी स्वत:वर नियंत्रण ठेवू शकली नाही व त्यांचे चुंबन घेतले. गिरीजा सिद्धरमय्या यांच्या वरुणा मतदारसंघातून येते. ती एका मंत्र्याची नातेवाईक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुढील लेख
Show comments