Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुषमा यांनी करवले हनीमून जोडप्याचे मिलन

Webdunia
पत्नीविना हनीमूनवर निघाल्या एका व्यक्तीला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मदतीने आपल्या पत्नीचा साथ मिळणार आहे.
दिल्ली रहिवासी फैझन पटेल याने आपल्या जवळच्या रिकाम्या सीटवर पत्नीचा फोटो लावत सुषमा स्वराज यांना लिहिले की या प्रकारे मी आपल्या पत्नीसह प्रवास करत आहे. तर सुषमा यांनी ट्विट करून म्हटले की आपल्या पत्नीला माझ्याशी संपर्क करायला सांगा. ती तुमच्या जवळच्या सीटवर असेल हे मी सुनिश्चित करेन.
 
फैझन आणि सनाने युरोप फिरण्याचा प्लान केला होता. परंतू तिकीट आणि व्हिसा जारी झाल्यावर लक्षात आले की सनाचा पासपोर्ट हरवला आहे. तेव्हा फैझनने आपली समस्या सुषमा स्वराज यांना ट्विटरद्वारे मांडली आणि या जोडप्याला त्वरित डुप्लिकेट पासपोर्टची सोय करण्यात आली.
 
फैझनने यासाठी आभार प्रकट करत म्हटले की सुषमाजी आपण एक योग्य मंत्री आहात. आपण सर्वांसाठी उमेदेची किरण सारख्या आहात. सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे मदत करण्याचं हे पहिलंच उदाहरण नाही. यापूर्वीही अशाच प्रकारे तातडीने मदत केल्याची उदाहरणं समोर आली आहेत.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments