Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्योतिषशास्त्रानुसार देवी आराधना!

वेबदुनिया
ऊँ विधुद्दामसमप्रभां मृगपतिस्कन्धस्थितां भीषणां। 
कन्याभि: करवालखेटविलसद्धस्ताभिरासेविताम्।।
 
हस्तैश्चकृगदासिरखेट विशिखांश्चापं गुणं तर्जनीं
विभ्राणामनलात्मिकां शशिधरां दुर्गा त्रिनेधां भजे।।
 
(मी त्रिनेत्रधारी दुर्गा देवीची आराधना करत आहे. देवीचे रूप तेजस्वी आहे. सिंहावर ती विराजमान असून तिच्या हातात चक्र, गदा, तलवार, ढाल, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत. आदीशक्तीची सेवा करण्‍यासाठी अनेक कुमारीका तलवार व ढाल हातात घेऊन देवीजवळ उभ्या आहेत. त्यांचेही रूप अग्निसमान तेजस्वी आहे. त्यांच्या माथ्यावर चंद्र दिसत आहे. या आदीशक्ती, चंडीका, अष्टभुजा देवीला म‍ी मनपूर्वक वंदन करतो.) 
अशा प्रकारे भगवती आईची आराधना करावी. 
 
एभि: स्तवैश्च मां नित्यं स्तोष्यतें य: समाहित:।
तस्याहं सकलां बाधां नाशर्शयएयाम्यसंशयम्।।
 
(अर्थात, जो कोणी‍ एकाग्रचित्ताने दररोज वरील स्तुतीने माझे स्तवन करेल त्याच्या जीवनातील बाधा दूर होऊन त्याचे जीवन सफल होईल.) 
 
भगवती आईची वरील स्तुतीच्या माध्यमातून आराधना केल्याने मनातील इच्छा पूर्ण होऊन सुखशांती लाभते. प्रत्येकाने नवरात्रीत देवीची आराधना अवश्य केली पाहिजे. दुर्गा सप्तशतीचे पारायण करावे. पापांचे हरण होऊन मोक्ष प्राप्त होतो.
 
अष्टम्यां च चतुर्दश्यां नवम्यां चैकचेतस:।
श्रोए‍यन्ति चैव ये भक्त्या गम माहात्यमुत्तमम।।
 
ने तेषां दुष्कृतं किश्चिद्‍ दुष्कृतोत्था न चापद:।
भविष्यति न दारिद्रयं न चैवेष्टवियोजनम्।।
 
शत्रुतो न भयं तस्य दस्युतो वा न राजत: 
न शस्त्रानलतोयौधात्कदाचित्सम्भविष्यति।।
 
देवी माहात्म्याचे स्मरण केल्यास दारिद्रय नष्ट होऊन घरी सुखशांती नांदेल. धनसंपत्तीची कधीच कमतरता भासणार नाही. जीवनातील सगळ्या अडचणी दूर होऊन पदरात यश पडेल. मनातील भीती दूर होईल. नेहमी प्रसन्न रहाल. नवदुर्गा उत्सवात दुर्गा मंदिरात देवी महात्म्य अथवा दुर्गा पाठ करणार्‍यास काहीच कमी पडणार नाही. त्याची रखडलेली कामे मार्गी लागतील. धन-धान्याची कमतरता भासणार नाही. निपुत्रिकांना पुत्र प्राप्त होईल. 
 
भगवती आई सांगते- 
यत्रेतत्पठयते सम्यङनित्यमायतने मम।
सदा न तद्धिमोक्ष्यामि सानिध्यं तत्र में स्थितम्।।
 
शरत्काले महापूजा क्रियते या च वार्षिकी।
तस्यां ममैतन्माहत्मयं श्रञत्वा भक्ति समन्वित:।।
 
आई जगदंबेचे माहात्म्य जो भक्त श्रवण करेल त्याचे सर्व शत्रू नष्ट होतील. त्याचे कल्याण होऊन घर धनधान्याने भरून जाईल. भयानक स्वप्न पडणार्‍यांनी भगवतीची‍ मनोभावे आराधना करावी. देवी माहात्म्याचे नियमित पठण केल्याने समस्या सुटतील.
 
शांतिकर्मणि सर्वत्र तथा दु:स्वप्रदर्शने।
ग्रहपीडासु चोग्रासु माहात्म्यं भृणुयान्मम।।
उपसर्गा: शमं यान्ति ग्रहपीडाश्च दारूणा:।
दु:स्वप्नं च नृभिदृष्टं सुस्वप्रभुपजायते।।
 
भगवतीची आराधना केल्याने जगदम्बा त्याला यश, वैभव, शांति प्रदान करते.
 
ऊँ बालार्कमण्डलाभासां चतुर्बाहुं त्रिलोचनाम्।
पाशाङ्कुशवरा भीतीधरियन्ती शिवां भजे।।

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments