Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरात्रात उपवासात सेंधव मीठचं का वापरतात, माहीत नसेल तर जाणून घ्या

नवरात्रात उपवासात सेंधव मीठचं का वापरतात, माहीत नसेल तर जाणून घ्या
, शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (10:17 IST)
नवरात्राच्या या पवित्र दिवसात देवी आईच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. तसेच देवी आईचा आशीर्वाद आणि त्यांची आपल्या वर कृपादृष्टी असावी या साठी नऊ दिवसांचे उपास देखील धरले जातात. नवरात्रीत सामान्य मीठ ऐवजी सेंधव मीठ वापरतात.

आज आम्ही आपणास सांगणार आहोत की उपवासात सामान्य मीठाच्या ऐवजी सेंधव मीठ का वापरतात. सेंधव मीठ हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 
 
* उपवासात सामान्य मीठ का वापरत नसतात - 
सामान्य मीठाचा वापर उपवासात करत नसतात. सामान्य मीठाला समुद्री मीठ असे देखील म्हणतात. या समुद्री मीठाला वास्तविक रूप देण्यासाठी बऱ्याच रासायनिक चाचण्या कराव्या लागतात. म्हणून याला शुद्ध असे मानत नाही पण सेंधव मीठ हे मीठाचं शुद्ध रूप असत ज्यामुळे याला उपवासासाठी शुद्ध मानतात. 
 
* सेंधव मीठ - 
सेंधव मीठाला दगडी (रॉक) मीठ देखील म्हणतात. या मध्ये खारटपणा कमी प्रमाणात असतो आणि आयोडीन मुक्त देखील असत. सेंधव मीठ पूर्णपणे शुद्ध असतं आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतं.
 
* रक्तदाब नियंत्रणात राहत - 
सेंधव मीठ हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. ह्याचे सेवन केल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतं. रक्तदाबाच्या रुग्णांनी आपल्या आहारात सेंधव मीठाचा समावेश करावा
 
* शरीरास निरोगी ठेवण्यात मदत करतं -
सेंधव मीठात लोह, झिंक, मॅग्नेशियम सह इतर खनिज मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीरास निरोगी ठेवण्यास मदत करतात. आपण दररोज देखील सेंधव मीठ घेऊ शकता.
 
* पाचन प्रणाली बळकट होते - 
सेंधव मीठाचं सेवन केल्यानं पाचन प्रणाली बळकट होते. पचन तंत्राला बळकट करण्यासाठी सेंधव मीठाचा आपल्या आहारात समावेश करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मारुतीची मूर्ती दिवसातून चक्क 3 वेळा रूप बदलते