Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री ललिता पंचमी महत्तव, माहिती आणि पूजा विधी

श्री ललिता पंचमी महत्तव, माहिती आणि पूजा विधी
, मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (19:00 IST)
श्री ललिता पंचमी म्हणजे आश्विन शुक्ल पंचमी ला उपांग ललिता व्रत करावयाचे आहे. हे काम्य व्रत आहे. ललिता देवी ही या व्रताची देवता आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते. या दिवशी भक्त व्रत व पूजा पाठ करतात. 
 
पौराणिक मान्यता
पौराणिक मान्यतानुसार या दिवशी ललिता 'भांडा' नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती. हा राक्षस कामदेवाच्या राखेने उत्तपन्न झाला होता. या दिवशी भक्त षोडषोपचार विधीने ललिता देवीचे पूजन करतात. ललिता देवीसह स्कन्दमाता आणि महादेवाची शास्त्रानुसार पूजा केली जाते. या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरतं. मान्यता आहे की या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी आणि शांती नांदते.
 
महत्त्व
आदि शक्ति आई ललिता दस महाविद्यांपैकी एक आहे. पंचमीचं व्रत भक्तांसाठी शुभ फलदायी आहे. यादिवशी पूजा आराधना केल्याने देवीचा आशिर्वाद प्राप्त होतो. 
 
जीनवात सुख आणि समृद्धी येते. पौराणिक मान्यतेनुसार आदिशक्ति, त्रिपुर सुंदरी, जगत जननी ललिता मातेच्या दर्शन मात्र केल्याने सर्व कष्टांचे निवारण होतं. ललिता पंचमी व्रत समस्त सुख प्रदान करणारी आहे. देवीची पूजा शक्ती प्रदान करते. 
 
देवी ललिता
शक्तिची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळतं. ज्यानुसार पिता दक्ष द्वारा अपमानित झाल्यावर जेव्हा दक्ष पुत्री सती आपले प्राण उत्सर्ग करते तेव्हा शिव त्यांचं पार्थिव देह आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरतात. ही महाविपत्ति बघून भगवान विष्णू चक्राने सतीची देह विभाजित करतात. नंतर भगवान शंकराच्या हृदयात धारण झाल्यामुळे हिला 'ललिता' नावाने ओळख मिळते. 
 
ललिता देवीचं प्रादुर्भाव तेव्हा होतं जेव्हा ब्रह्माद्वारा सोडण्यात आलेल्या चक्रामुळे पाताळ समाप्त होऊ लागतो. ही स्थिती बघून ‍ऋषी-मुनी घाबरु लागतात आणि संपूर्ण पृथ्वी हळू-हळू जलमग्न होऊ लागते. तेव्हा सर्व ऋषी माता ललिता देवीची उपासना करु लागतात. त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन देवी प्रकट होते आणि हे विनाशकारी चक्र थांबवते. सृष्टीला पुन: नवजीवन प्राप्त होतं.
 
पूजा पद्धत
एखाद्या करंडकाचे झाकण हे हिचे प्रतीक मानून पूजेला घेतात. सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात. केळीचे खांब आणि पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर बांधतात. ललितादेवीचे ध्यानमंत्र असे आहेत- 
 
नील कौशेयवसनां हेमाभं कमलासनाम। 
भक्तांना वरदां नित्यं ललितां चिन्तयाम्यहम्।। 
''कमलावर अधिष्ठित, निळे, रेशमी वस्त्र परिधान करणारी, सुवर्णकांतीची, भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो.'' 
 
या पूजाविधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंधाक्षता युक्त व साग्र अशा ४८ दुर्वा ललितेला वाहतात. नैवैद्यासाठी लाडू, वडे, घारगे वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या शेवटी घारग्यांचे वायन (वाण) देतात. रात्री जागरण व कथा श्रवण करतात. दुसऱ्या दिवशी ललितादेवीचे विसर्जन करतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवरात्र 9 दिवसचं का, जाणून घ्या 10 दुर्लभ गोष्टी