नवदुर्गा देवता नावाप्रमाणे श्री दुर्गा देवीच्या नऊ नावांनी संबोधिली जाते. नवदुर्गा स्थापना करताना कलशावरील ताम्हणात नऊ सुपार्या पूर्वेकडून क्रमाने एकेक ठेवून त्यावर कुंकुमाक्षता वाहाव्या आणि मंत्र म्हणावे -
जगत्पूज्ये जगद्वंद्ये सर्वशक्तिस्वरुपिणीं । पूजां गृहाण कामारिजगन्मातर्नमोऽस्तु ते ॥
हळद-कुंकू काजळ- मंगळसूत्र - काकणे हे अलंकार स्त्रियांना अत्यंत प्रिय , भूषणभूत आणि मंगलकारक आहेत. या देवतांनादेखील ते प्रिय आहेत. हे अलंकार अवश्य समर्पण करावे.