Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गरब्याला फॅशनचा 'टच'

मराठीत नवरात्रौत्सव
वेबदुनिया
नवरात्रौत्सवाच्या आगमनाने बाजारपेठ फुलू लागली आहे. बाजारात रंगबिरंगी पारंपरिक 'चणिया-चोळी' व 'केडियू'पासून तर अगदी विविध पॅटर्नमध्ये घागरा-ओढणी विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. फॅशनच्या भुताने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच झपाटलंय. बदलत्या काळानुसार पारंपरिक गरबा-दांडियामध्येही आधुनिकता डोकावत आहे. गरबा- दांडिया खेळताना केला जाणारा पेहराव हा देखील फॅशनेबल झाला आहे.
 
नवरात्रौत्सवानिमित्ताने गुजराती पद्धतीचे 'गरबा ड्रेसेस' बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पारंपरिक चणिया-चोळीला फॅशनेबल लुक देऊन त्यावर स्टोन, चमकी, काच, टिकल्या लावून त्यांची चमक-धमक वाढवी जाते.पुरुषांचे 'केडियू' देखील त्याच पद्धतीने समजविले जाताहेत.
 
केवळ मोठ्यांसाठीच नव्हे तर लहान मुलांच्या साइजमध्ये देखील 'चणिया-चोली' व 'केडियू' यांच्या भरपूर व्हरायटीज बाजारात उपलब्ध असतात. पारंपरिक गरबा पोशाख मुख्यत: राजकोट, अहमदाबाद, भावनगर व बडोदा येथून स्थानीय बाजारपेठेत येत असतात.
 
कसे असतात 'गरबा ड्रेसेस'
महिला व पुरुषांकरता गरबा ड्रेसेस वेगववेगळे असतात. महिलांच्या ड्रेसला 'चणिया-चोली' तर पुरुषांच्या ड्रेसला 'केडियू' म्हटले जाते. लहेंगा, चोली व ओढणी असा 'चणिया-चोली'चा पूर्ण सेट असतो. त्याचप्रमाणे पुरुषांचा 'केडियू'मध्ये रेडीमेड धोतर व घेरेदार शॉर्ट कुर्ता असतो. 'केडियू' टू पीस, थ्री पीस व फोर पीस मध्ये देखील येतात. त्यात कुर्त्याच्या आत घालण्यासाठी जॅकेट, डोक्यावर वर्ख केलेली चकाकणारी गोल टोपी, कुर्त्यावर लागणारे रेडीमेड धोतर असते.
 
लहान मुलांसाठी खास
लहान मुलांसाठी तर विविध व्हरायटीजमध्ये पारंपरिक गरबा ड्रेसेस बाजारात मिळतात. त्यात सुंदर 'चणिया-चोली' मुलींसाठी तर व 'केडियू' हा मुलांसाठी असतात. मुलांच्या ड्रेसेसवर मोती, घुंगरू, शंक आदींनी वर्ख करून त्यांना अधिक आकर्षक केले जातात.
 
गरबा ड्रेसेचे वैशिष्ट्य
'चणिया-चोली' व 'केडियू' यांच्यावर करण्यात येणार्‍या वर्खमध्ये साम्य असते. त्यावर नक्षीमध्ये काच वर्ख, आरी भरत, कोढी वर्ख, ऊन भरत, निम-जरी वर्ख, टिकली-मोती वर्ख, स्टोन वर्ख आदी केलेल्या गरबा ड्रेसेसला मोठी डिमांड आहे. जोधा-अकबर या चित्रपटात ड्रेसेसवर करण्यात आलेल्या रजवाडी स्टाइलमधील 'चणिया-चोली' यंदाच्या नवरात्रौत्सवात खास आकर्षण ठरत आहेत. 'जोधा-अकबर'च्याच नावाने ग्राहक मागणी करताना दिसत आहेत.
 
'चणिया-चोली' व 'केडियू' हे ड्रेस मुख्यत: कॉटन कपड्यापासून तयार होतात. मात्र, आता ग्राहकांकडून होणारी मागणी लक्षात घेता अशी ड्रेसेस सिल्क मटेरियलमध्येही उपलब्ध होत आहेत. कॉटनपेक्षा या ड्रेसेसच्या किंमती अधिक असतात. कॉटनची चणिया-चोली व केडियू 300 पासून 3000 रुपयांपर्यंत तर सिल्क मटेरियलमध्ये 500 पासून 5000 रुपयांपर्यंत आहेत.
 
परंपरेची झलक
'गरबा' नवशक्तिच्या आराधनेचे एक माध्यम आहे. तसेच ते आपल्या परंपरेचा वारसाही आहे. गरब्याने प्रांता-प्रांतातील संस्कृतीला जोडले आहे. पारंपरिक पेहराव गरब्याचे मुख्य आकर्षण असल्याने नवरात्रौत्सवात त्या माध्यमातून देशाच्या गौरवशाली सांस्कृतिक परंपरा जपली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनि देवाला तेल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि मंत्रांचे महत्त्व

वेगवेगळ्या रंगाच्या पर्स सोबत ठेवल्याने चमकते नशीब, जाणून घ्या महत्व

ईस्टरला अंडी खाणे शुभ मानले जाते, तुम्हीही बनवू शकता Egg Shakshuka

Easter 2025 Wishes In Marathi ईस्टरच्या शुभेच्छा

Bhanu Saptami 2025: भानु सप्तमीला सूर्यपूजेचे महत्त्व, शुभ योग- वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments