जे पदार्थ अर्पण करावयाचे असतील ते एका ताटात ठेवून व पाण्याने चौकोनी मंडल करुन त्यावर ठेवावे.
त्याभोवती पळीभर पाणी फिरवून ताम्हनात तुलसीयुक्त पाणी सोडावे. आपला डावा हात स्वत:च्या डोळ्यावर धरुन उजव्या हाताने जणू आपण देवीला भरवीत आहोत अशा प्रकारे कृती करावी.
यानंतर महानीरांजनदीप- कर्पूरदीप - पंचारती ओवाळून आरत्या म्हणाव्या. प्रार्थना म्हणावी. मंत्रपुष्प श्री देवीला समर्पण करावे. नंतर प्रदक्षिणा घालावी, नमस्कार करावा व
पूजा समाप्तीचे पूढील मंत्र म्हणून प्रार्थना करावी-
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् । पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरि ।