Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवरात्री स्पेशल..... का वापरायचे नऊ दिवस नऊ रंग?

Webdunia
दी.21/9/2017 गुरुवार रोजी नवरात्र सुरु होत आहे. नऊ दिवस हे नवग्रहांचे वार आहेत. नवग्रह हे श्री भगवतीचे सेवक आहेत.त्यांची कृपादृष्टी आपल्यावर रहावी म्हणून नवरात्रित हे रंग वस्त्र फ़क्त स्त्रिया नाही तर पुरुष पण वापरू शकतात.  

पाहीली माळ (गुरूवार) 21/9/17
रंग पिवळा

पिवळ रंग हा गुरु ग्रहाचा आहे. गुरुचे रत्न पुष्कराजपण पिवळे रंगाचे आहे. गुरु ग्रह आपल्या गुरुशी निगडित असतो. तसेच त्याचा प्रभाव हा मनुष्याच्या पोटावर असतो. या  दिवशी हा रंग वापरल्यास गुरु ग्रहाची कृपा आपल्यावर राहते व आपल्या आर्थिक आडचनी, विवाह समस्या दूर होण्यास मदत होते व पोटा सम्बंधित विकार दूर होण्यास मदत होते. 

दूसरी माळ (शुक्रवार) 22/9/17
रंग गुलाबी
 
शुक्र ग्रहाचा रंग तसा पांढरा आहे. पण हा रंग आपण सोमवारी घालतो. तसेच शुक्र हा प्रेमाचा आणी भोग विलासाचा कारक आहे. तसेच त्याचा प्रभाव हा आपल्या जिवनासाथिवर असतो. प्रेमाचा लाल रंग अणि शुक्राचा पांढरा रंग ऐकत्र केला आसता गुलाबी रंग तयार होतो.

ह्या दिवशी हा रंग वापरल्यास शुक्राची कृपा होउन माणसाचे जीवन ऐश आरामत जाते व सम्पत्तिची वृद्धी होते आणी गुप्तरोग समस्या दूर होतात. 

तीसरी माळ (शनिवार) 23/9/17
रंग निळा

नीळा रंग हा शनि देवाचे प्रतिक असून नीलम हे शानिदेवाचे रत्न आहे.
या दिवशी निळे रंगाचे वस्त्र परिधान केल्यास शनि देवाची अखंड कृपा आपल्यावर राहते. आपला साडेसातीचा त्रास कमी होतो व मानुस कोणाचे उपकार न घेता आपल्या जीवनात यशस्वी होतो.शनि आपल्या चुलत्याचे रक्षण करतो. 

चौथी माळ (रविवार) 24/9/17
रंग भगवा/केशरी

केशरी रंग हा उगवत्या सुर्याचा आहे. सूर्य हा उर्जेचा दाता आहे. तसेच तो आपल्या पित्याचे(वडिलांचे) रक्षण करतो. तसेच सुर्याचा अधिकार आपल्या ह्रदयावर असतो. या दिवशी हा रंग वापरल्यास मानुस सामर्थ्यवान बनतो व हृदयपिडेचा धोका कमी होतो. 

पाचवी माळ(सोमवार) 25/9/17
रंग पांढरा

हा रंग चंद्राचा असून चंद्र हा शांतीचे प्रतिक आहे. चंद्र आपल्या आईचे रक्षण करतो. तसेच तो माणसाच्या मनावर त्याचे प्रभुत्व आहे.या दिवशी हा रंग वापरल्यास मानसाचे मन स्थिर व शांत होते. त्याला भरपूर प्रमाणात मित्रसुख मिळते.

सहावी माळ (मंगळवार)26/9/17
रंग लाल

लाल रंग हा मंगळ ग्रहाचा आहे. हा ग्रह आपल्या भाऊ बहिणीचे रक्षण करतो. याचा प्रभाव आपल्या डोक्यावर असतो. या दिवशी हा रंग वापरल्यास मनुष्य मंगळपिडेतुन व कर्जपिड़ेतुन मुक्त होतो. त्याच्या घर जमिनिबाबत सर्व समस्या दूर होतात तसेच  रक्तपिडा, माईग्रेनसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. 

सातवी मळ (बुधवार)27/9/17
रंग हिरवा

अत्ता नेट वर या दिवसाचा रंग निळा संगीताला आहे. पण हे साफ चुकीचे आहे. बुधाचा रंग हा हिरवा आहे. त्याचे रत्न पाचू हे देखिल हिरव्या रंगाचे आहे. म्हणून या दिवशी हिरवे वस्त्र वापरावे. बुध हा आपल्या बुद्धिचा कारक आहे तसेच तो आपल्या मामाचे प्रतिनिधित्व करतो. याच्या कृपेने आपल्या बुद्धित वाढ होते व मनुष्य द्न्यानी बनतो. 

आठवी माळ (गुरुवार)28/9/17
रंग लिंबू कलर

पिवळ्य़ा रंगाच्या कोणत्याही छटा आपण या दिवशी वापरू शकतो. 

नववी माळ (शुक्रवार)29/9/17
रंग पोपटी  

शुक्रवार हा देवीचा वार असून  आपन या दिवशी शक्यतो हिरवा रंग देवीला नेसवतो. पण शुक्राचा सफ़ेद रंग त्यात ओतला की पोपटी रंग बनतो. या दिवशी हा रंग वापरल्यास आपल्यावर देवीची तसेच शुक्रग्रहाची कृपा रहाते. 

दहावी माळ (शनिवार)30/9/17
रंग करडा / राखाडी

नवग्रहानपैकी राहु आणी केतु या दोन ग्रहांना त्यांचा वार हा दिलेला नाही पण यांचा …परिणाम मनुष्याच्या जीवनावर होत असतो.
यांचे रत्न हे राखाडी रंगाचे आहे. या दिवशी हा रंग वापरल्यास मानुस हा राहुपीड़ा,केतुपिडा तसेच कालसर्पपीड़ा या पासून मुक्त होऊंन मनुष्याचा क्रूर स्वभाव शांत होतो.  व त्याच्या हातुन दान पुण्य होते तसेच आईचे व वडिलांचे माता  पिता दोन्ही आनंदात राहतात.

संबंधित माहिती

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

रविवारी करा आरती सूर्याची

श्री जोतिबा चालीसा Jotiba Chalisa

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

कोणाला स्वर्गात खाण्यासाठी काही मिळत नाही?

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments