Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २०

Webdunia
सोमवार, 18 जानेवारी 2021 (17:11 IST)
श्रीगणेशायनमः ॥ दुर्गेशाकंभरीश्रेष्ठेसहस्त्रनयनोज्वले ॥ त्वरीतेपाहिमांमातःसुप्तिवासांनिवारय ॥१॥
स्कंदम्हणेऐकासमस्त ॥ पौषमासझालियाप्राप्त ॥ शुद्धसप्तमीदिवसीव्रत ॥ आरंभीजेदेवींचें ॥२॥
उदयापावतांसहस्त्रकिरण ॥ कल्लोलतीर्थीकराविस्नान ॥ अभ्युदयिकश्राद्धकरून ॥ शाकंभरीसीपुजावें ॥३॥
प्रातःकाळीकरावेंपुजन ॥ नियमव्रतसंकल्पकरुन ॥ पौर्णिमेपर्यंतपूजन ॥ सततकरावेंअबेंचे ॥४॥
प्रतिदिवशींनियमधरुन ॥ वर्जकरावेंशाकभक्षण ॥ चतुर्दशीचेंनिशींजाण ॥ पुन्हांपुजावेंदेवीसी ॥५॥
पुष्पमाळबहुविध ॥ धूपदीपनैद्यविविध ॥ दीपावळीलावाच्यानवविध ॥ यथाविभवविस्तारें ॥६॥
उषःकालीसंतोषकारक ॥ देवीसीपुजावेंसम्यक ॥ पुन्हाप्रातःकाळहोतांचदेख ॥ स्नानकरोनीपुजावें ॥७॥
जोनररोगीदरिद्रदुःखित ॥ तोरनपौर्णिमेसश्रिद्धेयुक्त ॥ जगदंबेसीपुजीलनिश्चित ॥ तरीतुरजाकॄपाकरील ॥८॥
सहजभक्तवत्सलपुर्ण ॥ अंबिकेच्याकृपेकरुन ॥ मुक्तहोयरोगापासुन ॥ कुष्टादिरोगनाशिती ॥९॥
दद्रुपामाचर्चिकाक्षयादि ॥ अपस्मारश्लोष्प्रामृत्रकृच्छ्रादि ॥ अश्मरीज्वरातिसांरीकामुकरोगादी ॥ सर्वहीनाशपावती ॥१०॥
दारिद्रदोषापासुन ॥ मुक्तहोयपापापासुन ॥ तैसेंचसर्वदुःखापासुन ॥ महद्भयापासुनमुक्तहोय ॥११॥
पुन्हापौर्णिमेसीअनेकशाका ॥ अर्पुनपूजावीजगदंबिका ॥ ब्राह्मणसुवासिनीकुमारिका ॥ बहुतांसीभोजनघालावें ॥१२॥
दीनानाथबहुजन ॥ अन्नाथींयासीद्यावेंभोजन ॥ शैवपाशुपतकादिकरून ॥ भोजनघालावेंआदरें ॥१३॥
पौषशुद्धपौर्णिमेसी ॥ निष्ठाधरोनीमानसी ॥ तुरजादर्शनघेइलत्यासी ॥ पुण्यजोडेअगाध ॥१४॥
सत्पजन्मार्जितपापापासुन ॥ मुक्तहोय नलगतांक्षण ॥ सिद्धिप्राप्तहोतीपूर्ण ॥ देवादिकांसीदुर्लभज्या ॥१५॥
जोकालस्थीरभुमंडळ ॥ संततीपरंपरातोकाळ ॥ राहेआणिराज्यपदसकळ ॥ भोगुनीअंतीमुक्तहोय ॥१६॥
फारकायबोलूंआतां ॥ तुरजादेवीसमानदेवता ॥ स्वर्गमृत्युपाताळींपाहतां ॥ नसेब्रह्मांडींदुसरी ॥१७॥
पौषमासविधीसपांदुन ॥ माघमासप्राप्तजालीजाण ॥ सप्तमीसीसुर्योदयींस्नान ॥ विष्णुतीर्थाचेंकरावें ॥१८॥
सुर्याचेंकरावेंपुजन ॥ तंदुलाक्षतारक्तचंदन ॥ करवीरजपापुष्पेंकरुन ॥ करावेंअर्चनसद्भावें ॥१९॥
गुडघेटेकोनीभृमीवरी ॥ अर्ध्यपात्रघेऊनीकरी ॥ वक्षमाणमंत्रीनिर्धारी ॥ अर्ध्यद्यावेंसुर्यासी ॥२०॥
श्लोक ॥ नमोनमस्तेस्तुसहस्त्रभानवे ॥ सहस्त्रपादाक्षीसहस्त्रचक्षुषे ॥ पद्मप्रबोधायहिरण्यमयायहिरण्यवर्णायाहिरण्यरतसे ॥१॥
ओवी ॥ यामंत्रेंअर्ध्यदेऊन ॥ भास्कराचेंकरीजोपुजन ॥ सर्वव्याधीनिर्मुक्तहोऊन ॥ अंतीजाय सुर्यलोक ॥२१॥
माघशुक्लपौर्णिमेसी ॥ अक्षतापुष्पेंपुंजावेदेवीसी ॥ गुडोदनपायसान्नभोजनासी ॥ ब्राह्मणासीसमर्पिजे ॥२२॥
तेणेंधनधान्यसमन्वित ॥ पुत्रपौत्रपरिवारयुक्त ॥ निरंजनसमयीदेवीप्रत ॥ जेअवलोकनकरितीनेमानें ॥२३॥
ब्रह्माहत्यादिपापेंजळतीदारुण ॥ दरिद्रदोषजायनिघुन ॥ माघकृष्णचतुर्दशीजाण ॥ शिवारात्रीम्हणतीजीलागीं ॥२४॥
तेदिवशींकरोनीउपोषण ॥ रात्रोसिद्धेश्वराचेंपुजन ॥ बिल्वधतुरपुष्पअर्पून ॥ जागरदीपदानकरावें ॥२५॥
गीतवाद्यनर्तन ॥ करावेंपुराणश्रवण ॥ निशासरलीयादेवीसीपूजोन ॥ पारणाकरावीविधीयुक्त ॥२६॥
तेनरशिवलोकसीजाती ॥ फाल्गुनमासाचीझालीयाप्राप्ती ॥ फाल्गुनकृष्णाष्टमीतिथी ॥ जगंदंबेसीपुजावें ॥२७॥
महाविष्णुचीमहाशक्ति ॥ परमेश्वरीस्वयज्योती ॥ शक्तिशक्तिमानाभेदस्थिती ॥ अव्यक्तरूपअद्वैत ॥ २८॥
सुवर्णसुवर्णचीकांती ॥ वेगळेपणेभिन्ननसती ॥ अव्यक्तासी मायायोगेंव्यक्ति ॥ भिन्नाकृतीदिसती ॥२९॥
नारायणनारायणी ॥ अर्थएकशब्ददोनी ॥ लिंगभेदेंहोतीम्हणोनी ॥ अर्थभिन्ननसेची ॥३०॥
ऐसीजगदंबानारायणी ॥ तिचीअष्टमीसीपुजोनी ॥ प्रदक्षणाघालाव्याभावेंकरोनी ॥ अष्टोत्तरशतसंख्या ॥३१॥
तरीसर्वकामसमृद्धीप्रती ॥ तोनरपावेलनिश्चिती ॥ ऐसेंशंकरमुनीवराप्रती ॥ सांगतेझालेप्रीतीनें ॥३२॥
चैत्रमासझालियाप्राप्त ॥ नवरात्रकरावेंपूर्ववत ॥ यथाशक्तीनिष्ठांवतं ॥ पुजाकरावीनित्यशः ॥३३॥
जगदंबाभक्तवत्सला ॥ तिचाकरितीउत्साहसोहळा ॥ तेपावतीसायुज्याला ॥ भोगभोगुनीयांलोकीं ॥३४॥
चैत्रशुद्धनवमीसी ॥ पुनर्वसुनक्षत्रविशेषेंसी ॥ मध्यगतसूर्यमाध्यान्हारी ॥ श्रीरामाचाअवतार ॥३५॥
रामलक्ष्मणभरतशुत्रुघ्न ॥ दशातथकौशल्यादिमातीतीन ॥ परिवारसहितश्रीरामपुजन ॥ रामतीर्थींकरावें ॥३६॥
रामतीर्थीकरुनस्नान ॥ श्रीरामाचेंकरावेंपुजन ॥ रामवरदाथिनीदेवींचेंपुजन ॥ पुन्हासंद्भावें करावें ॥३७॥
विधीयुक्तउपोषण ॥ करावेंव्रतविसर्जन ॥ ब्राह्मणसुवासिनीकन्याभोजन ॥ यथाशक्तिकरावें ॥३८॥
तोजाईलरामसायुज्यासी ॥ संशयनधरावामानसीं ॥ शंकरसांगेवरिष्टासी ॥ ऐकपुढेंकर्तव्यजें ॥३९॥
चैत्रकृष्णअष्टमीसी ॥ भौमवराधिकपुण्यराशी ॥ अन्यथाकेवळअष्टमीसी ॥ टोळभैरवासींपुजावें ॥४०॥
अंबिकेनेंपरमवीर ॥ पुत्रमानिलासाचार ॥ टोळभैरवनामनिर्धार ॥ केलाप्ररमप्रीतीनें ॥४१॥
त्यासीपुजावेंनानउपाचारें ॥ तैलपक्कमाषान्नवरें ॥ मद्यमांसेसंयथाअधिकारें ॥ तांबुलादिसमर्पावें ॥४२॥
पुजकासीसर्वसिद्धिप्राप्ती ॥ जयसर्वत्रपावेनिश्चिती ॥ चिंतिलेमनोरथपूर्णहोती ॥ पातकेंजळतीसर्वही ॥४३॥
वैशाखमासतृप्तीयातिथीसी ॥ देवीच्यानैऋत्यप्रदेशीं ॥ रेणुकेसहितपरशुरामासी ॥ भक्तिभावेंपुजावें ॥४४॥
नागतीर्थीकरुनस्नान ॥ ब्राह्मणासीनानांविधदान ॥ देऊनमाध्यान्हसमयींपुजन ॥ भार्गवाचेंकरावें ॥४५॥
जोकांबाणधनुधीरी ॥ भृगुंवंशाचीकिर्तीउभारी ॥ त्याचेंपुजेनेंनिर्धारी ॥ वैकुंटप्राप्तीहोतसे ॥४६॥
जेथेंनाहींपुनरावृती ॥ ऐसीयाविष्णुभुवनासीजाती ॥ शंकरसांगेवरिष्ठाप्रती ॥ विसावाअध्यायपूर्णझाला ॥४७॥
पांडुरंगजनार्दन ॥ श्रोतियादेतसेनिमंत्रण ॥ पुढीलकथाकरावयाश्रवण ॥ सहकुंटुबयाम्हणे ॥४८॥
इतिश्रीस्कंदपुराणे ॥ सह्याद्रीखंडे ॥ तुरजामहात्म्ये ॥ शंकरवरिष्ट संवादे ॥ विंशोध्यायः ॥२०॥
श्रीजगदंबापर्णमस्तु ॥ शुभंभवतु ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

तुळशीला सिंदूर लावल्यास काय होते?

श्री सूर्याची आरती

आरती शनिवारची

शनि त्रयोदशी 2024 पूजा विधी, साहित्य आणि मंत्र

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments