Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Navratri 2022: नवरात्रीच्या उपवासात कुट्टूच्या पिठाचे पकोडे बनवा, साहित्य आणि कृती जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (21:40 IST)
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये लोक देवी आईची पूजा करतात. घटस्थापना आणि विधिपूर्वक पूजा करण्याबरोबरच लोक देवीचे नऊ दिवस उपवास करतात. ज्यामध्ये फक्त उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. उपवासाच्या नऊ दिवसांत पोट भरण्याबरोबरच स्वादिष्ट असे काही खावेसे वाटते. तर कुट्टूच्या पिठापासून बनवलेले पकोडे करून पहा. कुट्टुचे पीठ आणि बटाटे मिसळून तयार केलेले हे पकोडे नवरात्रीच्या वेळी पाहुण्यांना खायलाही देऊ शकता. तसेच, ते पूर्णपणे उपवासाचे आहे. जे खाल्ल्याने ऊर्जा तर मिळेलच तसेच नवरात्राच्या उपवासाची  भूकही भागेल. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य- 
 एक वाटी कुट्टूचे पीठ, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, हिरवी कोथिंबीर बारीक चिरून, दोन ते तीन उकडलेले बटाटे, सेंधव मीठ, भाजलेले जिरे, लाल तिखट,  काळी मिरपूड,.तळण्यासाठी साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल.
 
कृती- 
सर्वप्रथम बटाटे उकळून घ्या. नंतर हे बटाटे सोलून घ्या. एका भांड्यात सोललेले बटाटे चांगले मॅश करा. लक्षात ठेवा बटाटे थंड झाल्यावरच मॅश करा. मॅश बटाट्यामध्ये काळी मिरपूड, लाल तिखट, बारीक चिरलेल कोथिंबीर जिरेपूड घालून सर्व गोष्टी व्यवस्थित मॅश करा. सर्व साहित्य बटाट्यात मॅश झाल्यावर त्यात सेंधव मीठ टाका.
 
पकोड्यांसाठी एका भांड्यात कुट्टूचं पीठ घ्या. त्यात थोडेसे सेंधव  मीठ आणि काळी मिरपूड घाला. नीट मिक्स झाल्यावर त्यात पाणी घालून पातळ पीठ तयार करा. आता गॅसवर पॅन ठेवा आणि तेल घालून गरम करा. थोडेसे मॅश केलेले बटाटे घ्या आणि त्यांना गोल आकार द्या. हे गोल आकाराचे बटाट्याचे मिश्रण कुट्टूच्या  पिठात बुडवून तेलात घातल्यावर मध्यम आचेवर तळून घ्या. त्याचप्रमाणे सर्व पकोडे तयार करून सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्या. कुट्टूच्या पिठाचे पकोडे तयार आहेत. कोथिंबिरीच्या उपवासाच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

श्री सूर्याची आरती

काल भैरव आरती Kaal Bhairav Aarti

कालभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले?

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments