Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अन्न नासाडी टाळण्यासाठी ‘फूड दोस्ती’ अँप

Webdunia
तुम्ही आम्ही सगळेच हॉटेलिंग तर नेहमीच करतो. शिवाय याच हॉटेलमध्ये गेलं नाही की घेतलेलं अन्न टाकून देणारेही सर्रास दिसतात. पण आता हेच टाळण्यासाठी पुण्यातल्या संजीव नेवे, अनिता नेवे आणि त्यांच्या टीमनं एक खास अँप तयार केलं आहे, जे हॉटेल मालक आणि गरजूंचा दुवा झालं आहे.
 
हॉटेलमध्ये जेवायला गेलो की काही ना काही उरवण्याची सवय आता बदलू शकेल आणि हॉटेल मालकांनाही उरलेलं खाणयोग्य अन्न गरजूंपर्यंत पोहोचवता येईल, असा दुहेरी उद्देश साध्य होऊ शकणार आहे. पुण्यातल्या नेवे दाम्पत्यानं ही कल्पना टेक्नोलॉजीच्या मदतीनं साकारली आहे. प्रत्येक हॉटेलसाठी तयार करण्यात आलेल्या या खास सॉफ्टवेअरमुळे हॉटेलमालकांना गरजूंपर्यंत पोहोचता येईलच. पण आपल्याला जसं मॉल्समधल्या शॉपिंगवर पॉईंट्स अँड होतात, तसेच एक्सट्रॉ पॉईंट्स मिळणार आहेत. पण तेही तुम्ही तुमच्या ताटातलं अन्न संपूर्ण संपवलं तरच. हे अँप असणार 3 घटकांच्या हाती. पहिला हॉटेलचा मालक. दुसरा ग्राहक. आणि तिसरा घटक म्हणजे एनजीओ, जे गरजूंपर्यंत अन्न पोहोचवू शकतात. 
 
फूड दोस्तीच्या आधारे हे घटक एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात. हॉटेलमध्ये खाण्यायोग्य अन्न किती आहे याची माहिती ङ्खूड दोस्तीवर टाकली की एनजीओपर्यंत ती मोबाइल अँप्लिकेशनच्या माध्यमातूनही पोहोचते आणि ग्राहकांना मिळणारे पॉईंट्स ते ङ्खूड दोस्ती अँप असणार्‍या कोणत्याही दुसर्‍या हॉटेलमध्ये रिडीमही होऊ शकतात. या अँपच्या माध्यमातून समोर येऊ लागलाय तो हाङ्ख प्लेट डिमांड कन्सेप्ट. तुम्हाला संपूर्ण डीश जाणार नसेल तर अर्धीच मागवा. पैसे पूर्ण डिशचे द्या. पण निम्मे पैसे पॉईंट्सच्या स्वरूपात तुमच्या अकाऊंटमध्ये अँड होणार आहेत. पुढच्या वेळी तुम्ही हे पॉईंट्स रिडीम करू शकता. नुकत्याच लॉन्च झालेल्या अँपची व्याप्ती भारतभर व्हावी. जेणेकरून प्रत्येक नागरिकाला अन्नाचं महत्त्व कळेल. तो स्वत: अन्न वाचवण्यासाठी प्रयत्न करेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजूंपर्यंत अन्न जाईल, या उद्देशानं हा उपक्रम सुरू झाला आहे. 12 जणांच्या टीमनं हे अँप यशस्वीपणे कार्यरत केलं आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

पुढील लेख
Show comments