Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोबाइल वापरताना या 10 चुका करता?

Webdunia
आज अनेक लोकांच्या हातात स्मार्टफोन दिसतो. दिवसभर आपण फोन वापरत असतो. पण काय तुम्ही स्मार्टफोन स्मार्टपणे वापरता का? अनेक जण स्मार्टफोनचा उपयोग स्मार्टपणे करत नाही. पाहा कसे.
 
1. सिक्युरिटी पासवर्ड : तुमच्या मोबाइलमध्ये तुम्ही सिक्युरीटी पासवर्ड ठेवली का नाही. कारण तुम्ही जर तसं करत नसाल तर तुमच्या ऑफ सिममध्ये किंवा इतर ठिकाणी तुमचे प्राईवेट फोटो आणि इतर गोष्टी लोकं पाहातील. त्यामुळे पासवर्ड जरुर ठेवा.
 
2. फ्री वाय-फाय : जर तुम्ही फ्री वायफाय वापरत असाल तर त्यासोबत तुमच्या मोबाइलसाठी रिस्कदेखील वाढते. हॅकर तुमचा डेटा चोरू शकतो. त्यामुळे कोणताही अनोळखी वायफाय वापरु नका.
 
3. स्मार्टफोन साफ करा : स्मार्टफोनमध्ये एका टॉयलेटसीटपेक्षा अधिक जंतू असू शकतात. त्यामुळे स्मार्टफोन वेळोवेळी साफ करा. यासाठी तुम्ही अँटी बॅक्टेरिअल सोल्यूशन वापरु शकता.
 
4. स्मार्टफोन अधिक चार्ज करणे : स्मार्टफोन गरजेपेक्षा अधिक चार्ज केल्याने बॅटरी लवकर खराब होते. फोन रात्रभर चार्जिगला लावून ठेवू नका.
 
5. अँटी व्हायरस : तुमचा फोनदेखील एका छोटय़ा स्मार्टफोनप्रमाणेच आहे. कम्प्युटरप्रमाणे स्मार्टफोनलाही अँटी व्हायरसची गरज असते. त्यामुळे तुमचा फोन अधिक सुरक्षित राहतो.
 
6. अँटी थेफ्ट अँप्स : फोन कधीही चोरी होऊ शकतो. त्यामुळे फोन चोरी झाल्यानंतर तुमचा डेटा कोणाच्या हाती लागू नये म्हणून अँटी थेप्ट अँप तुमच्या मोबाइलमध्ये असू द्या. त्यामुळे मोबाइल चोरी झाल्यानंतर तुमचा डेटा डिलीट होण्यासाठी हा अँप जरुर ठेवा.
 
7. सॉफ्टवेअर अपडेट : सॉफ्टवेअर अपडेट तुमच्या फोनचं फंक्शन अधिक चांगलं करते. त्यामुळे अपडेट राहणं अधिक चांगलं.
 
8. कोणतंही अँप इंस्टॉल करणं : अनेकदा कोणतंही अँप आपण सहज इंस्टॉल करुन टाकतो. फोनमध्ये चांगले अँप गरजेचे आहे पण कोणतंही अँप इंस्टॉल करण्यापूर्वी त्याचं प्रोडक्ट रेटिंग आणि रिव्ह्यू नक्की पाहा.
 
9. लिंकवर क्लिक : जर तुम्हाला कोणीही कोणतीही लिंक पाठवत असेल तर त्यावर क्लिक करु नका. यामुळे तुमच्या फोनच्या अडचणी वाढतात. अनेकदा या लिंक ओपन करतांना तुमच्या मोबाइलमध्ये व्हायरस येऊ शकतो. अनेक फसवणार्‍या लिंकपासून सावध राहा.
 
10. ब्लूटूथ ऑन : फोनमधील ब्लूटूथ नेहमी सुरु असणं योग्य नाही, यामुळे तुमची बॅटरी लवकर संपते किंवा हॅकर याचा फायदा घेऊ शकता. ते तुमचा मोबाइल अँक्सेस करु शकता. ब्लूटूथ कनेक्शनची रेंज 10 मीटरपर्यंत असते. त्यामुळे कोणीही तुमच्या मोबाइलला अक्सेस करु शकतं. 

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments