Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

1 जुलैपासून 13 अंकांचे होतील मोबाईल नंबर

1 जुलैपासून 13 अंकांचे होतील मोबाईल नंबर
नवी दिल्ली- 1 जुलै 2018 नंतर आपण मोबाईल नंबर घेत असाल तर आपल्याला दहा ऐवजी 13 अंकांचा नंबर मिळेल. केंद्रीय संचार मंत्रालयाने सर्व राज्यांना या संबंधात निर्देश जारी केले आहेत. बीएसएनएलने याची तयारी सुरू केली आहे.
 
अधिकृत सूत्रांप्रमाणे मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत या संबंधात निर्णय घेण्यात आला होता. बैठकीत म्हटले होते की दहा अंकांच्या लेवलमध्ये आता नवीन मोबाईल नंबर देणे शक्य नाही. म्हणूनच दहाहून अधिक अंकांची सीरीज सुरू केली गेली पाहिजे आणि नंतर सर्व मोबाईल नंबर 13 अंकांचे करावे.
 
या संबंधात सर्व सर्कलच्या दूरसंचार सेवा प्रदाता कंपन्यांनी हे लागू करण्याचे आदेश जारी करत म्हटले आहे की आपले सर्व सिस्टम याप्रमाणे अपडेट करावे. बीएसएनएल (इंदूर) चे वरिष्ठ महाप्रबंधक सुरेश बाबू प्रजापती यांनी सांगितले की डिसेंबर 2018 पर्यंत जुने मोबाईल नंबरदेखील या प्रक्रियेअंतर्गत अपडेट होतील.
 
वर्तमान नंबर कसे बदलतील, प्रक्रिया निश्चित नाही
 
सूत्रांप्रमाणे वर्तमान मध्ये चालू असलेले 10 अंकांचे मोबाईल नंबर ऑक्टोबरपासून 13 अंकांप्रमाणे अपडेट करणे सुरू केले जाईल. हे काम 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. वर्तमान मोबाईल नंबरमध्ये बदल कसे होईल हे मात्र अजून पूर्णपणे स्पष्ट नाही. या नंबरमध्ये 3 डिजिट आधी जुळतील वा नंतर हे स्पष्ट नाही.
 
मोबाईल सॉफ्टवेअर होतील अपडेट
 
सूत्रांप्रमाणे या संबंधात मोबाईल हेडसेट बनवणार्‍या कंपन्यांनाही निर्देश दिले गेले आहेत की ग्राहकांना समस्या येऊ नाही म्हणून त्यांनी आपले सॉफ्टवेअर याप्रमाणे अपडेट करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपसाठी कर्नाटक दक्षिणेतील प्रवेशद्वार : अमित शहा