Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिओला ‘६’ सीरिजचे नवे नंबर देण्याची परवानगी

Webdunia
दूरसंचार विभागाकडून रिलायन्स जिओला नव्या सीरिजचे नंबर देण्याची परवानगी मिळाली असून हा नंबर ‘६’ सीरिजचा असल्याची माहिती आहे. ६ सीरिजचा एमएससी (मोबाईल स्विचिंग कोड) जारी करण्यासाठी रिलायन्स जिओला दूरसंचार विभागाकडून परवानगी मिळाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिओच्या काही ठराविक सर्कलमध्येच ६ सीरिजचे नंबर वितरीत केले जातील. जिओ सध्या मिळालेल्या परवानगीनुसार एमएससी नंबर आसाम, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये वितरीत करणार आहे. राज्यस्थानमध्ये ६००१०-६००१९, आसाममध्ये ६००३०-६००३९ आणि तामिळनाडूमध्ये ६००४०-६००४९ असा एमएससी कोड असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.या सीरिजचे नंबर जिओने दिले तर ६ सीरिजचे नंबर देणारी ही पहिलीच दूरसंचार कंपनी असेल. आतापर्यंत ९, ८ आणि ७ या सीरिजचे नंबर जारी करण्यात आले आहेत. दूरसंचार विभागाने या सीरिजला परवानगी देण्यामागे जिओचे वाढते युझर्स हे कारण असल्याचे बोलले जात आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

इस्रोला मोठा धक्का, PSLV C62 तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाडामुळे मिशन अयशस्वी

LIVE: संजय राऊत यांच्या मुंबई बंद करण्याच्या विधानाला फडणवीसांचे प्रत्युत्तर

अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला

राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा 2026 Rajmata Jijau Jayanti Wishes In Marathi

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस महिला विरोधी असल्याचा आरोप

पुढील लेख
Show comments