suvichar

मोटो झेड आणि मोटोमॉडची फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर विक्री

Webdunia
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016 (17:17 IST)
मोटोरोला कंपनीचा बहुचर्चित स्मार्टफोन मोटो झेड आणि मोटोमॉडची सोमवारी मध्यरात्रीपासून फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर विक्री सुरू होत आहे. मोटो झेडमध्ये टर्बो बॅटरी चार्जिंगची सुविधा देण्यात आल्याने केवळ १५ मिनिटांतच बॅटरी चार्ज करता येणार आहे. तर अँड्रॉईड मॅशमेलो ६.०.१ या ऑपरेटींग् सिस्टिमवर हा फोन चालणार आहे. याशिवाय डिस्प्ले ५.५ QHD चा असेल. ४ जीबी रॅम, ३२/६४ जीबी इंटरर्नल मेमरी आणि २ टीबीपर्यंत एक्सपांडेबल मेमरी अशी त्याची वैशिष्ट्ये असतील. सोबतच स्मार्टफोनची जाडी केवळ ५.२ मि.मी. असल्याने हा जगातला सर्वात पातळ प्रिमियम स्मार्टफोन असल्याचा दावा करण्यात येत आहे. 
 
मोटो झेड च्या बॅक पॅनलला मॉड डिव्हाईस देण्यात येणार आहे. त्यात जेबीएलचे स्पीकर, प्रोजेक्टर वैशिष्ट्यपूर्ण बॅक पॅनल्स आणि पॉवरबँक अशा सुविधा असतील. मोटोमॉडच्या साह्याने बॅकपॅनलचे रुपांतर झुमची सोय असलेल्या कॅमेऱ्यात करता येणे शक्य आहे. त्यामुळे हा वेगळा अनुभव असणार आहे. मोटो झेड साधारपणे ४० हजार, तर मोटो प्ले २५ हजार रुपयांत उपलब्ध होणार आहे. तर मोटो मॉडच्या प्रत्येक डिव्हाईससाठी वेगळी किंमत मोजावी लागणार असून ती १५ हजारापर्यंत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

Maharashtra Day 2026 Wishes in Marathi महाराष्ट्र दिन शुभेच्छा

मुंबई : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा

LIVE: अमृत ​​भारत एक्सप्रेस ५ मे पासून मुंबई आणि अयोध्या दरम्यान नियमित सेवेसह धावणार

1 मे पासून अनेक नियम बदल, वाचा

Exit Poll: आजच्या चाणक्य एक्झिट पोलनुसार भाजप १९२ हून अधिक जागांवर पुढे, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पुढील लेख
Show comments