Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेडमी नोट ९ प्रो स्मार्टफोनची भारतात विक्री सुरु

रेडमी नोट ९ प्रो स्मार्टफोनची भारतात विक्री सुरु
, बुधवार, 6 मे 2020 (22:05 IST)
रेडमी नोट ९ प्रो स्मार्टफोनची भारतात विक्री सुरु झाली आहे.  शाओमी इंडिया वेबसाइट आणि अॅमेझॉनवरुन विकत घेता येणार आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये या स्मार्टफोनची डिलीव्हरी करण्यात येणार आहे.
 
रेडमी नोट ९ प्रो भारतात दोन वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. 4GB + 64GB आणि 6GB + 128GB. त्यांची किंमत अनुक्रमे १३,९९९ आणि १६,९९९ रुपये आहे. आयसीआयसीआय क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर एक हजार रुपयांची सूट दिली जात आहे. तसंच, ही ऑफर आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर लागू असेल.
 
हा स्मार्टफोन अँड्रॉइड बेस्ड MIUI 11 वर चालतो आणि ६.६७ इंचाचा फुल-एचडी + (१०८०x२४०० पिक्सल) IPS डिस्प्ले आहे. हा 6GB LPDDR4X रॅम, Adreno 618 GPU आणि ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आहे.
 
फोटोग्राफीसाठी क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा आहे. याशिवाय 8MPचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 5MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. त्याची अंतर्गत मेमरी 128 जीबी आहे. रेडमी नोट ९ प्रो मध्ये 18W फास्ट चार्जिंगसह 5,020mAh बॅटरी आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर ने सुविधा उपलब्ध करून द्याव्या