rashifal-2026

सॅमसंग परत मागवतेय गॅलक्सी नोट-7 मोबाईल

Webdunia
सोमवार, 12 सप्टेंबर 2016 (12:08 IST)
जगामध्ये मोबाईल निर्मिती आणि विक्रीत आघाडीवर असलेल्या सॅमसंगला मोठा धक्का बसला आहे. सॅमसंग निर्मित असलेल्या गॅलक्सी नोट-7 मध्ये काही तांत्रिक बिघाड झाले आहे.त्यामुळे हा मोबाईल अचानक स्फोट घेत आहे. या मधील पहिली घटना अमेरिकेत उघड झाली आहे.
 
फ्लोरिडा शहरात ही  घटना  घडली. नॅथन डॉर्नेचर असं त्या व्यक्तीचं नाव आहे.नॅथनच्या माहितीनुसार, गॅलेक्सी नोट 7 हा स्मार्टफोन त्याने जीपमध्ये चार्जिंगला लावला होता. मात्र त्याचवेळी फोनचा स्फोट झाला. या घटनेत गाडीलाही आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करावं लागलं. या घटनेत फोन आणि गाडीच्या आतील भागाची अक्षरश: राख झाली होती.
 
या प्रकारच्या अनेक घटना जगभरात नोंदविल्या आहेत.तर सॅमसंग कंपनीने आपली चूक मान्य केली असून मोबाईलच्या बॅटरी खराब असून त्यामुळे हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कंपनीनं हे सर्व फोन परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातून 2.5 मिलियन म्हणजे 25 लाख फोन परत मागवले जाणार आहेत. त्याऐवजी दुसरे मोबाईल कंपनी ग्राहकांना देणार आहे. सध्या नवीन ‘गॅलक्सी नोट 7’ ची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कंपनीला १ अब्ज मिलियन डॉलरच नुकसान होणार आहे.
 
 
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 LIVE: अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्समध्ये मोठी घसरण

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27: चित्रपट उद्योगाला थेट दिलासा मिळाला नाही, परंतु सरकार सर्जनशील क्षेत्रावर मोठा भर देण्याचे संकेत

अर्थसंकल्पात 7 नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा

बलुचिस्तानमध्ये लष्कराची कारवाई, 67 दहशतवाद्यांचा खात्मा

एलेना रायबाकिना आर्यना सबालेंला पराभूत करत ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती ठरली

पुढील लेख
Show comments