rashifal-2026

आता स्मार्टफोनमध्येच इनबिल्ट प्रोजेक्टर!

Webdunia
बुधवार, 17 जानेवारी 2018 (13:20 IST)
स्मार्टफोनमध्ये प्रोजेक्टर असल्यास किती मजा येईल असा विचार आपण करत असाल, तर आता मोव्हीफोन या मॉडेलमध्ये याच प्रकारचे इनबिल्ट प्रोजेक्टर देण्यात आले आहे. मोव्ही कंपनीने दोन वर्षांपूर्वीच स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट प्रोजेक्टर देण्याचे घोषित केले होते. या मॉडेलची तेव्हा प्राथमिक माहितीदेखील देण्यात आली होती. तथापि, आता हा प्रोजेक्टरयुक्त स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार असून याचे लास व्हेगास शहरात सुरू असलेल्या सीईएस-2018 या प्रदर्शनात अनावरण करण्यात आले आहे. या स्मार्टफोनच्या वरील बाजूस पिको कंपनीचे प्रोजेक्टर देण्यात आले आहे. याच्या मदतीने एचडी म्हणजेच 720 पिक्सल्स क्षमतेच्या प्रतिमा आणि चलचित्र प्रक्षेपित करून 200 इंच आकारमानाच्या स्क्रीनवर पाहता येतात. विशेष बाब म्हणजे स्मार्टफोन कसाही फिरवला तरी पडद्यावर  उमटणार्‍या प्रतिमा वा व्हिडिओ या आपोआप अ‍ॅडजस्ट होतात. खरं तर अलीकडच्या काळात अत्यंत आटोपशीर आकाराचे प्रोजेक्टर बाजारात उपलब्ध आहेत. मात्र एखाद्या स्मार्टफोनमध्येच अशा प्रकारची सुविधा असल्यास पोर्टेबल प्रोजेक्टरची गरजदेखील उरणार नाही. तत्काळ एखादे प्रेझेंटेशन दाखविण्यासह शैक्षणिक वा मनोरंजन बाबींसाठी याचा वापर होऊ शकतो. यामुळे अर्थातच हे मोव्हीफोनमधील सर्वात लक्षणीय फीचर मानले जात आहे. उर्वरित फीचर्सचा विचार केला असता यात 5.5 इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यात मीडियाटेक एटी6750 प्रोसेसर असून 3 जीबी रॅम /32 जीबी स्टोअरेज आणि 4 जीबी रॅम/64 जीबी स्टोअरेज असे दोन पर्याय असतील. हे स्टोअरेज 128 जीबीपर्यंत वाढविता येईल. या स्मार्टफोनमध्ये 13 व 8 मेगापिक्सल्सचे मुख्य व फ्रंट कॅमेरे आहेत. तर यातील 4,000 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर चार तासांपर्यंत प्रोजेक्टर चालवता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. अर्थात फुल   बॅटरी असल्यास एखादा चित्रपट पाहणे सहजशक्य आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. याचे मूल्य 599 डॉलर्स (सुारे 38 हजार रूपये) इतके असून ते लवकरच बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मोव्ही कंपनीने दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

महिलेच्या मृत्यूनंतर कूपर रुग्णालयात गोंधळ, जुहू पोलिसांनी नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला

LIVE: नागपुरात रक्तरंजित बर्थडे पार्टी, छत्रपती चौकात ऑटोरिक्षातून उतरताच हल्ला

बीएमसी निवडणुकीत 32 जागांसाठी थेट लढत निश्चित

Bank Holiday January 2026: या महिन्यात बँका 16 दिवस बंद राहतील, संपूर्ण लिस्ट जाणून घ्या

अंधेरी पश्चिममध्ये बनावट दुधाचे रॅकेट उघडकीस, 7 जणांना अटक

पुढील लेख
Show comments